शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
3
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
4
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
5
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
6
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
7
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
8
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
9
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
10
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
11
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
12
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
13
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
14
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
15
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
16
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
17
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
18
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
19
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
20
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर

अन् चालकाने मारली धावत्या ट्रकमधून उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:01 IST

ट्रकला थांबवून कारवाई करण्यात आली. ट्रक पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी मोहाडीकडे नेण्यास सांगण्यात आले. चालकासोबत गृहरक्षक दलाचा जवान त्या ट्रकमध्ये बसला. ट्रक मोहाडीकडे निघाला. मात्र काही अंतर जात नाही तोच चालकाने धावत्या ट्रकमधून उडी मारली आणि धुम ठोकली. ट्रकमध्ये बसलेला गृहरक्षक दलाचा जवान घाबरला. त्यानेही खाली उडी मारली.

ठळक मुद्देरेती तस्करी : रोहणा-दहेगाव मार्गावरील थरार, कारवाई टाळण्यासाठी केला प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : रेती तस्करीचा ट्रक महसूल अधिकाऱ्यांनी पकडला. गृहरक्षक दलाच्या जवानाला बसवून ट्रक पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी मोहाडीकडे जाण्यास सांगितले. रेतीने भरलेला ट्रक मोहाडीकडे निघाला. मात्र काही कळायच्या आत रोहणा - दहेगाव दरम्यान चालकाने चक्क धावत्या ट्रकमधून उडी घेतली. हा प्रकार पाहून गृहरक्षक दलाच्या जवानानेही पाठोपाठ उडी मारली. सुदैवाने ट्रक एका नालीत जाऊन थांबला. मोठा अनर्थ टळला.रेती तस्करीसाठी कसा आटापिटा सुरु आहे याचा प्रत्यय मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास महसूल अधिकारी आणि पोलिसांना याची देही याची डोळा बघता आला.तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरु आहे. रेती तस्करांवर नियंत्रण ठेवणे महसूल आणि पोलीस प्रशासनालाही कठीण झाले आहे. महसूल प्रशासनाने रेतीचोरांना पकडण्यासाठी विशेष पथक तयार केले. त्याच पथकातील नायब तहसीलदार घनश्याम सोनकुसरे मंगळवारी कामगिरीवर होते.दुपारी २ वाजताच्या सुमारास रोहणा - दहेगाव रस्त्यावर एमएच ३६ एफ ३४८८ क्रमांकाचा रेती भरलेला ट्रक आला. त्या ट्रकला थांबवून कारवाई करण्यात आली. ट्रक पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी मोहाडीकडे नेण्यास सांगण्यात आले. चालकासोबत गृहरक्षक दलाचा जवान त्या ट्रकमध्ये बसला. ट्रक मोहाडीकडे निघाला. मात्र काही अंतर जात नाही तोच चालकाने धावत्या ट्रकमधून उडी मारली आणि धुम ठोकली. ट्रकमध्ये बसलेला गृहरक्षक दलाचा जवान घाबरला. त्यानेही खाली उडी मारली. त्याला किरकोळ दुखापत झाली. चालकाविना ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन नालीत जाऊन रुतला. हा प्रकार पाहून महसूलच्या पथकाने ट्रक चालकाचा पाठलाग केला. परंतु तो हाती लागला नाही.आता फसलेला हा ट्रक काढण्यासाठी वरठी येथून मशीन बोलाविण्यात आली.चालकांची नवी शक्कलरेती तस्करीतील ट्रक पकडला तर अधिकाऱ्यांच्या हाती लागू नये म्हणून चालकांनी नवीन शक्कल काढली आहे. रस्त्याच्या कडेला ट्रक कुठेतरी फसवून ठेवायचा. रात्रीची प्रतीक्षा करायची. ताब्यात आलेले वाहन निगरानी करणाऱ्याला पटवायचे आणि ट्रक तेथून घेऊन पळून जायचे. परंतु मंगळवारी नालीत घुसविलेल्या ट्रकचालकाची कल्पना यशस्वी होऊ दिली नाही. नायब तहसीलदार सोनकुसरे व तलाठी तेथे तळ ठोकून आहेत.

टॅग्स :sandवाळू