शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
2
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
3
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
4
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
5
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
6
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
7
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
8
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
9
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
10
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
11
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव
12
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
13
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक
14
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
15
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
16
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
17
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
18
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
19
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
20
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...

दांडेगावजवळ अपघातात दोन्ही ट्रकचे चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 21:50 IST

दोन भरधाव ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन्ही ट्रकचे चालक जागीच ठार झाल्याची घटना तालुक्यातील साकोली मार्गावरील दांडेगाव शिवारात मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली. ट्रकच्या केबिनचा चुराडा झाल्याने चालकांना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

ठळक मुद्देसमोरासमोर धडक : दोन्ही ट्रकच्या केबिनचा झाला चुराडा

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : दोन भरधाव ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन्ही ट्रकचे चालक जागीच ठार झाल्याची घटना तालुक्यातील साकोली मार्गावरील दांडेगाव शिवारात मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली. ट्रकच्या केबिनचा चुराडा झाल्याने चालकांना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.सचिन उर्फ मोंटू पुरुषोत्तम भुते (२७) रा.लाखांदूर आणि लक्ष्मणनंद पांचाम चिन्नपल्लम (४०) रा.कावेरी चेटीपट्टी (तामीळनाडू) अशी मृत चालकांची नावे आहेत. लाखांदूरवरून ट्रक (क्रमांक टीएन ५२ एच ३४९४) हा लोखंड घेऊन साकोलीकडे जात होता. तर ट्रक (क्रमांक एमएच ३६ एफ १८५१) हा धानाचे पोते घेऊन लाखांदूरकडे येत होता. साकोली लाखांदूर मार्गादरम्यान दांडेगाव परिसरात मंगळवारी रात्री दहा वाजता दोन्ही ट्रकची समोरासमोर टक्कर झाली. त्यात दोन्ही ट्रकचे चालक जागीच ठार झाले. अपघात एवढा भीषण होता की दोन्ही चालकांना काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. या अपघाताने तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच दिघोरीचे ठाणेदार गावंडे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.