शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
4
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
5
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
6
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
7
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
8
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
9
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
10
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
11
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
12
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
13
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
14
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
15
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
16
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
17
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
18
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
19
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
20
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

तुटपुंज्या अनुदानाने घरकुलाचे स्वप्न अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 06:00 IST

जिल्ह्यात विविध योजनांच्या माध्यमातून घरकुलांसाठी अनुदान दिले जाते. मात्र लाभार्थ्यांना मिळत असलेले अनुदान हे अत्यंत तुटपुंजे आहे. अलिकडे बांधकाम साहित्यात प्रचंड वाढ झाली आहे. विटा, रेती, मजुरी, सीमेंट आदीत झालेली वाढ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. किमान ८०० चौरस फुट घर बांधकामासाठी मोठा खर्च येतो.

ठळक मुद्देसंडे अँकर । रेती, विटा, मजुरीचा खर्च वाढला, अनुदान मात्र जुनेच

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रत्येकाला आपल्या हक्काचे घर असावे, असे वाटते. प्रत्येक जण घर बांधण्याचे स्वप्न बघत असतो. मात्र विविध कारणांमुळे आणि आर्थिक अडचणींमुळे अनेकांना घर बांधणे शक्य होत नाही. अशांसाठी शासनाची घरकुल योजना आहे. मात्र आता ही घरकुल योजनाही मृगजळ ठरू पाहत आहे. तुटपुंज्या अनुदानात घरकुल बांधावे तरी कसे असा प्रश्न लाभार्थ्यांना पडल्याचे जिल्ह्यात दिसत आहे.जिल्ह्यात विविध योजनांच्या माध्यमातून घरकुलांसाठी अनुदान दिले जाते. मात्र लाभार्थ्यांना मिळत असलेले अनुदान हे अत्यंत तुटपुंजे आहे. अलिकडे बांधकाम साहित्यात प्रचंड वाढ झाली आहे. विटा, रेती, मजुरी, सीमेंट आदीत झालेली वाढ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. किमान ८०० चौरस फुट घर बांधकामासाठी मोठा खर्च येतो. त्यामुळे सार्वसामान्यांचे घर बांधण्याचे स्वप्न अपूर्ण राहत आहे. अनेक लाभार्थ्यांचे घरकुल अपुर्णावस्थेत असल्याचे जिल्ह्यात दिसून येते. पहिला टप्पा बांधल्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे अनुदान दिले जाते. परंतु अनेकांचे बजेट पहिल्या टप्प्यातच कोलमडून जाते. घरकुलाचे लाभार्थीही दारिद्र्य रेषेखाली आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक अंदाज घेऊनच घरकुलाचे बांधकाम करावे लागते.जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजनेसह आदिवासी विकास प्रकल्प विभागांतर्गत शबरी घरकुल योजना राबविली जाते. परंतु घरकुलासाठी अगदी तुटपुंजे अनुदान मिळते. या अनुदानात घर कसे बांधावे असा मोठा प्रश्न लाभार्थ्यांपुढे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक घरकुलांचे बांधकाम रखडले असून शासनाने घरकुलाच्या निधीत भरीव वाढ करावी अशी मागणी केली जात आहे. परंतु सध्यातरी या बाबत शासनस्तरावर कोणत्याही उपाययोजना होत असल्याचे दिसत नाही.अनुदानासाठी कसरतसर्व कागदपत्रांची जुळवाजुळव केल्यानंतर घरकुलाला मंजुरी मिळते. घरकुलाच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम करावे लागते. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून अनुदान देण्यात येते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे काम स्लॅबपर्यंत आल्यानंतर अनुदान मिळते. परंतु दुसऱ्या टप्प्याचे अनुदान मिळण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. दुसऱ्या टप्प्यातच अनेकांचे घरकुल अपुर्ण असल्याचे दिसून येते. या अडचणींवर मात करून तिसऱ्या टप्प्याच्या अनुदानासाठी मात्र शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागते. एकीकडे मजुरीवर जावे की शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे असा प्रश्न लाभार्थ्यांपुढे पडलेला असतो. केंद्र व राज्य सरकारने या सर्व बाबींचा विचार करून घरकुलांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्याची मागणी केली जात आहे. सध्यातरी जिल्ह्यात अनेकांच्या घराचे स्वप्न अपुर्णच असल्याचे दिसून येते.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना