शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

महसूलने खोदलेली नाली रेतीमाफियांनी बुजविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:40 IST

लाखनी : लाखनी तालुक्यातील चुलबंध नदीपात्रातील पळसगाव (को.) येथील रेतीघाटातून मागील वर्षीपासून सर्रास अहोरात्र अवैद्य रेतीचा उपसा राजकीय वरदहस्ताने ...

लाखनी : लाखनी तालुक्यातील चुलबंध नदीपात्रातील पळसगाव (को.) येथील रेतीघाटातून मागील वर्षीपासून सर्रास अहोरात्र अवैद्य रेतीचा उपसा राजकीय वरदहस्ताने महसूल व पोलीस विभागाच्या मोठमोठ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना चिरीमिरी देऊन राजरोसपणे भर चौकातून खुलेआम सुरू आहे.

पळसगाव (को.) रेतीघाटातील रेतीतस्करीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ३१ डिसेंबर २०२० ला पळसगाव (को.) घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जे.सी.बी. यंत्राद्वारे मोठमोठ्या नाल्या खोदल्या होत्या. या नाल्या असल्याकारणाने रेतीघाटाकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद होऊन रेतीचोरीला बराचसा आळा बसण्यास मदत झाली होती; परंतु ही खोदलेली नाली १९ जानेवारीला पूर्णतः बुजविल्याने या मार्गावरील रेतीची अवैध वाहतूक बिनधास्तपणे पुन्हा सुरू झाली असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

पालांदूर परिसरातील चुलबंद नदीपात्रातील पळसगाव घाटात मोठ्या प्रमाणात दर्जेदार रेती साठा असून, येथील रेती तालुकाभर प्रसिद्ध आहे.

सध्या रेतीघाटांचे लिलाव झाले नसल्याने रेती चोरी जाऊ नये व रेतीच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला आळा बसावा याकरिता पालांदूर (चौ.) महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी राकेश पंधरे व कोलारी साझा क्र. २२ चे तलाठी के.बी. मेश्राम व इतर कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ३१ डिसेंबर २०२० ला पळसगाव (को.) येथील घाटाकडे जाणाऱ्या शिवारात मोठी व रुंद नाली खोदली. रेतीतस्करांची हिंमत लक्षात घेता या नालीची सद्य:स्थितीत प्रत्यक्ष पाहणी केली असता ती माती टाकून बुजविण्यात आल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. परिसरातील रेतीमाफियांनी परस्पर संगनमताने ही नाली बुजविण्याचा प्रकार केल्याची दबक्या आवाजात पळसगाव परिसरात चर्चा सुरू होती.

नाली बुजविली गेल्यामुळे या मार्गावरून पुन्हा जोमात रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक सर्रास सुरू असल्याने शासनाच्या लाखोंचा महसूल बुडत असून, हा महसूल वाचविण्याकरिता संबंधित नाली बुजविणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून पुन्हा नाली खोदण्यात यावी, असे पळसगाव (को.) येथील सुज्ञ नागरिकांनी माहिती देताना सांगितले.

बाॅक्स

पोलिसांत तक्रार नाही

पळसगाव (को.) शिवारात खोदण्यात आलेले नाली बुजविण्यात आल्याची माहिती महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना तात्काळ मिळाली.

हा प्रकार कुणी आणि कशासाठी केला याची जाणीवही महसूल विभागातील कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांना आहे; परंतु या गंभीर प्रकाराबाबत कर्मचारी अथवा अधिकाऱ्यांनी पालांदूर (चौ.) येथील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली नाही.

रेतीतस्कर रेतीचा अवैध उपसा आणि वाहतुकीसाठी राजकीय नेत्यांची मदत घेत असल्याने त्यांच्याविरोधात प्रभावी कारवाई केली जात नाही. ही वस्तुस्थिती आहे.

कोट

‘मोक्यावर पडताळणी करण्याकरिता गेलो असता नाली बुजवली असल्याचे आढळून आले. त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात रेतीही चोरी गेली असल्याचे दिसले. यासंबंधीचा अहवाल तहसीलदार साहेब लाखणी यांना सविस्तर पाठविलेला आहे.’

-के.बी. मेश्राम, तलाठी, कोलारी (प.)

कोट

रेतीतस्करीमुळे पळसगाव परिसरातील रस्ते पूर्णतः उघडलेले आहेत. नाली खोदल्यामुळे रेतीतस्करीस पुष्कळसा आळा बसला होता. पुन्हा नाली खोदण्यास सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.

-विलास सार्वे, सरपंच, पळसगाव(को.)