कोरोना केवळ पॅसेंजर रेल्वेतूनच पसरतो का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 05:00 IST2021-07-17T05:00:00+5:302021-07-17T05:00:09+5:30
मुंबई-हावडा या मार्गावर प्रवाशांची मोठी रेलचेल असते. एकट्या भंडारा रोड रेल्वे स्थानकातून सहा एक्स्प्रेस गाड्यांमधून शेकडो प्रवासी प्रवास करत आहेत. मग पॅसेंजर गाड्या का बंद आहेत. याचा उत्तर दिले जात नाही, हेच एक न उलगडणारे कोडे आहे. प्रवाशांना मात्र तिकीटाचा भुर्दंड बसतो.

कोरोना केवळ पॅसेंजर रेल्वेतूनच पसरतो का?
इंद्रपाल कटकवार
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना महामारीमुळे रेल्वेची थांबलेली चाके पुन्हा धावायला लागली आहेत. मात्र, आरक्षण करून रेल्वेच्या प्रवास करावा लागत आहे. परिणामी लोकल गाड्या कमीच असल्याने फक्त कोरोना पॅसेंजर रेल्वेतूनच पसरतो का? असा सवालही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
भंडारा रोड रेल्वे स्थानकातून सध्या विदर्भ एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस, गीतांजली एक्स्प्रेस, निजामुद्दीन एक्स्प्रेस, अहमदाबाद एक्स्प्रेस, समता एक्स्प्रेस गाड्यांचे आवागमन होत आहेत. उल्लेखनीय म्हणजे भंडारा रोड रेल्वे स्थानकातून फक्त एक सर्वसाधारण लोकल गाडी धावत आहे.
मग पॅसेंजर बंद का
मुंबई-हावडा या मार्गावर प्रवाशांची मोठी रेलचेल असते. एकट्या भंडारा रोड रेल्वे स्थानकातून सहा एक्स्प्रेस गाड्यांमधून शेकडो प्रवासी प्रवास करत आहेत. मग पॅसेंजर गाड्या का बंद आहेत. याचा उत्तर दिले जात नाही, हेच एक न उलगडणारे कोडे आहे. प्रवाशांना मात्र तिकीटाचा भुर्दंड बसतो.
सध्या एकही स्पेशल ट्रेन सुरू नाही
- भंडारा रोड रेल्वे स्थानकातून सहा एक्स्प्रेस गाड्या धावत असून लांबपल्ल्याच्या स्पेशल ट्रेन येथे थांबत नाहीत. या रेल्वे स्थानकातून ३४ रेल्वे गाड्या धावत असतात. पॅसेंजर नसल्याचे अडचण होते.
एक्सस्प्रेसचा प्रवास परवडत नाही
रेल्वेचा प्रवास पुन्हा सुरू केला आहे. सर्वसाधारण प्रवाशांना लोकल भाडे आकारायला हवे. मात्र, विशेष रेल्वे गाड्यांच्या नावावर प्रवास तिकीट दुप्पट घेतली जात आहे. याचा आम्हाला फटका बसत आहे.
-संतोष वाघमारे, प्रवासी
लोकल गाडीने प्रवास करता येते मात्र तिकीट दुपटीपेक्षा जास्त आहे. दररोज अप-डाऊन करणे शक्य बाब नाही. या मार्गावर पॅसेंजर रेल्वेची संख्या वाढवायची गरज आहे. रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
-सुधाकर लांडे, प्रवासी.
प्रवाशांना बसतो भुर्दंड
- विशेष रेल्वेगाड्यांच्या नावाखाली प्रवाशांची लूट सुरू आहे. परिणामी हा आर्थिक भुर्दंड बसू नये म्हणून पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची नितांत गरज आहे. कोरोनाची धास्ती न बाळगता प्रवाशांचे हित ही लक्षात घेणे गरजेचे आहे.