शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

दस्तऐवज ओलेचिंब; जबाबदार कोण?

By admin | Updated: July 23, 2014 23:27 IST

येथील तहसील कार्यालय इंग्रजकालीन असून या कार्यालयाला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र दुरूस्तीअभावी या कार्यालयाला वाईट दिवस आले आहेत. पावसाळ्यात पाणी गळतीमुळे या कार्यालयातील

दोष कुणाचा : साकोली तहसील कार्यालय दुरूस्तीसाठी निधी नाही साकोली : येथील तहसील कार्यालय इंग्रजकालीन असून या कार्यालयाला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र दुरूस्तीअभावी या कार्यालयाला वाईट दिवस आले आहेत. पावसाळ्यात पाणी गळतीमुळे या कार्यालयातील महत्वाची कागदपत्रे खराब झाली. याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग की तहसील कार्यालय हा प्रश्न अनुत्तरीत असला तरी पुरातन काळापासून उपयोगात असलेले दस्ताऐवज मात्र खराब झाले आहे.येथील तहसील कार्यालयाची इमारतीची दुरूस्ती करण्यात यावी यासाठी तहसीलदार साकोली यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम राज्य विभाग भंडारा यांना १५ जून २०१३, २६ जून २०१३, १ मार्च २०१४, २२ एप्रिल २०१४ व २५ मे २०१४ ला लेखी पत्र पाठवून तहसील कार्यालयाच्या इमारतीच्या छतातून पाणी गळत असून भितीस नुकसान होत आहे. त्यामुळे प्राणहाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासकीय अभिलेख खराब होऊ शकते, कार्यालयातील विद्युत उपकरणे खराब होवून जिवीतहानी होऊ शकते. त्यामुळे या कार्यालयाची दुरूस्ती तात्काळ करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली मात्र या पत्रावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे काहीच कार्यवाही केली नाही. परिणामी संततधार पावसामुळे या कार्यालयातील महत्वाची कागदपत्रे अखेर खराब झालेली आहे.साकोली तहसील कार्यालयाची इमारत ब्रिटीशकालीन असून या इमारतीची साधी डागडुजीही झालेली नाही. या तहसील कार्यालयात तालुक्यातील नागरिकांचे महत्वपूर्ण दस्ताऐवज आहे. शेतकऱ्यांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांना या कार्यालयाची गरज पडते. दुरूस्तीसाठी निधी आला नाहीयासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता निपाने यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले की, तहसीलदार यांच्या पत्रानुसार सदर कार्यालयाच्या दुरूस्तीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. मात्र निधी उपलब्ध न झाल्यामुळे दुरूस्ती करण्यात आली नाही. (तालुका प्रतिनिधी)