विकासकामे करताना भेदभाव करू नका

By Admin | Updated: July 27, 2015 00:53 IST2015-07-27T00:53:37+5:302015-07-27T00:53:37+5:30

प्रत्येक लोकप्रतिनिधींनी राजकारण करताना पक्षाचा स्वाभिमान बाळगावा.

Do not discriminate during development work | विकासकामे करताना भेदभाव करू नका

विकासकामे करताना भेदभाव करू नका

बाळा काशीवार यांचे प्रतिपादन : नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार समारंभ
साकोली : प्रत्येक लोकप्रतिनिधींनी राजकारण करताना पक्षाचा स्वाभिमान बाळगावा. मात्र विकास कामे करताना भेदभाव करू नका. कारण भेदभाव केल्याने पक्षांतर्गत विरोध वाढून विरोधकांना टीका करण्याची संधी मिळते. त्यामुळे विकास कामात अडचणी निर्माण होतात व विकास होत नाही. जनतेने आपल्याला विकास कामे करण्यासाठीच निवडून दिलेले आहे. याचे भान प्रत्येक लोकप्रतिनिधींनी लक्षात ठेवले पाहिजे. असे मत आ.बाळा काशिवार यांनी खा.नाना पटोले यांच्या जनसंपर्क कार्यालय सेंदूरवाफा येथे आयोजित नवनियुक्त जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले. यावेळी मंचावर डॉ.प्रकाश मालगावे, डॉ.शाम झिंगरे, तालुकाध्यक्ष शंकर राऊत, सभापती धनपाल उंदिरवाडे, उपसभापती लखन बर्वे, माजी सभापती रेखा भाजीपाले, जि.प. सदस्य नेपाल रंगारी, बंडू बोरकर नितीन खेडीकर, डॉ.शंकर ब्राह्मणकर, दिपक मेंढे, इंद्रायणी कापगते व ईश्वरदास सोनवाने उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी आ.बाळा काशिवार, डॉ.श्याम झिंगरे, डॉ.प्रकाश मालगावे यांच्यातर्फे नवनियुक्त जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच भाजपाच्या जनसंपर्क महाअभियान कार्यक्रमाचीही माहिती देण्यात आली व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन लालू करंजेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष शंकर राऊत यांनी मानले. कार्यक्रमाला नितीन खेडीकर, ललीत खराबे, संदीप बावनकुळे, अमोल हलमारे, सदू कापगते यांच्यासह परिसरातील भाजप कार्यकर्ते व नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Do not discriminate during development work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.