उच्च शिक्षणाचे ध्येय बाळगा
By Admin | Updated: August 6, 2014 23:41 IST2014-08-06T23:41:23+5:302014-08-06T23:41:23+5:30
समाजातील विद्यार्थ्याने उच्च शिक्षण घेवून नाव लौकिक करावे यासाठी कठिण परिश्रम घ्यावे लागेल. समाज तुमच्या पाठीशी आहे, असे मार्गदर्शन डॉ.प्रल्हाद हरडे यांनी केले.

उच्च शिक्षणाचे ध्येय बाळगा
विद्यार्थ्यांचा सत्कार : प्रल्हाद हरडे यांचे प्रतिपादन
भंडारा : समाजातील विद्यार्थ्याने उच्च शिक्षण घेवून नाव लौकिक करावे यासाठी कठिण परिश्रम घ्यावे लागेल. समाज तुमच्या पाठीशी आहे, असे मार्गदर्शन डॉ.प्रल्हाद हरडे यांनी केले.
जैन कलार समाजातील १० वी १२ वीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी या कार्यक्रमात हरिकृष्ण घाटबांधे, प्रा.अनिल भांडारकर, विजय खेडीकर, चंद्रप्रकाश द्रुगकर, वृषाली क्षिरसागर, प्रा.निलू तिडके उपस्थित होते.
याप्रसंगी अजिंक्य क्षिरसागर, आशय चिरवतकर, समीर फुलबांधे, कोमल मदारकर, पायल पालांदुरकर, राशी कावरे, चेतन हरडे, अंकुश लांजेवार, रूचा बनवाडे, वंशिका पेशने, मंजुषा खोब्रागडे, घर्षना खेडीकर, वेदश्री घाटबांधे, रोहित खेडीकर, आस्था क्षिरसागर या गुणवंताचा सत्कार करण्यात आला.
संचालन आभा मानापुरे यांनी तर आभार प्रदर्शन दत्तात्रय खंगार यांनी केले. कार्यक्रमासाठी रविंद्र भांडारकर, विलास भांडारकर, विलास पेशने, वामन भदाडे, अजय क्षिरसागर, संजय आदमने, भागवत हरडे, निर्मला घाटबांधे, संजय अहिरकर आदी समाज बांधवांचे सहकार्य लाभले. (वार्ताहर)