दिवाळीचा बाजार सजला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 22:47 IST2018-11-05T22:47:39+5:302018-11-05T22:47:54+5:30
दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीला नागरिकांनी खरेदीसाठी चांगलीच गर्दी केल्याने बाजारात लाखोंची उलाढाल झाली. दोन दिवसांपूर्वी बाजारपेठेत काही प्रमाणात शुकशुकाट जाणवत होता. मात्र दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीला नागरिक साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी करताना दिसले. दिवाळीच्या बाजारात शेवटच्या क्षणी रंगत आल्याचे दिसले.

दिवाळीचा बाजार सजला
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीला नागरिकांनी खरेदीसाठी चांगलीच गर्दी केल्याने बाजारात लाखोंची उलाढाल झाली. दोन दिवसांपूर्वी बाजारपेठेत काही प्रमाणात शुकशुकाट जाणवत होता. मात्र दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीला नागरिक साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी करताना दिसले. दिवाळीच्या बाजारात शेवटच्या क्षणी रंगत आल्याचे दिसले.
जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असल्याने ग्रामीण क्षेत्रासह तालुका मुख्यालयातून येणाऱ्यांची संख्या जास्त असते. दुसरीकडे दोन दिवसांपासून एसटी कर्मचाºयांचा संप सुरू असल्याने खाजगी वाहनांची वर्दळ जास्त दिसून आली. परंतु ग्रामीण भागातील एसटीच्या साहयाने साहित्यांची वाहतूक ठप्प झाली होती. याचाही मोठा फटका लघु व्यवसायिकांना बसल्याचे दिसून आला.
शहरातील मुख्य मार्गावर कापड, भांडे व ज्वेलर्स यांची दुकाने असल्याने सर्वात जास्त गर्दी दिसून आली. मागील आठवड्यांपर्यत बाजारात चांगलाच शुकशुकाट होता. सोमवारपासून बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी दिसून आली. रविवारी बाजाराचा दिवस असल्याने लाखोंची उलाढाल झालीे. मुख्य मार्गाच्या दोन्ही कडेला वाहनांची पार्किंग होत असल्याने वाहतुकीचा वारंवार खोळंबा होत होता. रांगोळी, पणत्या, कापड दुकान, भांड्यांच्या दुकानात ग्राहकांची सर्वात जास्त गर्दी दिसत होती.
शहराच्या मुख्य मार्ग अरूंद असल्याने वाहतुकीची कोंडी होणे हा नविन विषय नसला तरी पोलिस प्रशासनाच्या एकेरी वाहतुक नियमाचा फज्जा उडाल्याचे दिसले. धनत्रयोदशीला ज्वेलर्स दुकानात गर्दी दिसून येत असली तरी मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीे व्यवसाय कमी झाल्याचे सराफा व्यावसायिकांमध्ये चर्चा आहे. नोटाबंदी व जीएसटीचा फटका व अन्य बाबींमुळेही बाजारपेठेत मंदी असल्याचे व्यापारी बोलून दाखवित आहेत. तरीही यात लाखोंची उलाढाल झालेली आहे. वृत्त लिहीपर्यंत सोन्याचांदीचा उलाढालीचा नेमका आकडा उपलब्ध होऊ शकला नाही.