पालांदुरात फटाक्यांच्या आतषबाजीत दिवाळीचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 00:46 IST2018-11-09T00:45:12+5:302018-11-09T00:46:47+5:30
अतिशय हर्षाेल्हासित वातावरणात पारंपारिकतेच्या आधारावर पालांदूरात बुधवारला सायंकाळी ६ ते ८ या वेळेत विधीवत लक्ष्मीपूजन पार पडले. नयमरम्य फटाक्यांची आतषबाजी आकाशाकडे लक्ष वेधून घेत होती.

पालांदुरात फटाक्यांच्या आतषबाजीत दिवाळीचा जल्लोष
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : अतिशय हर्षाेल्हासित वातावरणात पारंपारिकतेच्या आधारावर पालांदूरात बुधवारला सायंकाळी ६ ते ८ या वेळेत विधीवत लक्ष्मीपूजन पार पडले. नयमरम्य फटाक्यांची आतषबाजी आकाशाकडे लक्ष वेधून घेत होती. बच्चे कंपनी फुलझडी, अनार, चकरी, सापगोळी आदी फटाक्यांच्या नादात करू एकमेकांचे तोंड गोड करीत शुभेच्छांचा वर्षाव झाला. समाजमन प्रफुल्लीतपणे एकमेकांना हस्तादोंलन करीत गोड जेवणाकरीता आग्रह घरीत व्यंजनाची यादी आपआपसात वाचन होते. आदिवासी गोवारी समाजानेही आपली दैवत असलेली ढाल पूजन गावकऱ्यांना डफऱ्यांची व बिरण्याची मजेदार मेजवाणी दिली. सत्तरवर्षाचे म्हातारे नातवासोबत टिपऱ्यांच्या मदतीने लाजवाब नाचत होते. घरोघरी आकाशकंदिल, वीजदिवे, मातीचे दिवे पेटवून प्रकाशाच्या सोबतीने लक्ष्मीपूजन पार पडले. बाजारातही गर्दी फुललेली होती. बुधवारला बारजबंद असूनही केवळ लक्ष्मीपूजना निमित्ताने बाजार सुरू ठेवला होता. कापड, किराणा, मिष्ठान, इलेक्ट्रिक दुकानात सकाळपासूनच गर्दी फुलली होती. जेवनानंतर एकमेकांच्या घरी पान खाण्याची परंपरा मात्र लोप पावली. शिक्षणाकरिता नोकरीनिमित्ताने बाहेर असणारी मंडळी गावाकडे येत आप्तांच्या घरी भेटून एकमेकांना आचार विचाराची देवाण घेवाण करीत होते.
उपवर-वधूची चर्चा
दिवाळीनिमित्ताने पाहुण्यांची रेलचेल सुरू झाली आहे. यात एकमेकांकडे असलेली उपवरवधूची चाय पे चर्चा सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागात जगण्याचा खरी गोडी इथूनच मिळत आहे. विदर्भातील पाच जिल्ह्यातील धानाचा हंगाम अंतीम टप्प्यात आला आहे. हंगाम आटोपताच वर-वधूची जोडणी सुरू होणार हे निश्चित.
गोवारी बांधवांनी ढाल पुजन
आदिवासी गोवारी समाज आजही हातावर आणून पानावर खाणारा अधिक आहे. गरीबीत पडलेला समाज दिवाळीनिमित्ताने ढाल पूजन पारंपारिक कला, वाद्य जीवंत ठेवून समाजाचे मनोरंजन करीत आहे.
मंडई उत्सवाला उधाण
भाऊबीजेपासून झाडीपट्टीत मंडई उत्सवाला आरंभ होत आहे. अर्थात शुक्रवार पासून मंडईचा हंगाम जोर धरणार आहे. शनिवारला पालांदुरची मंडई नियोजित आहे. अफाट गर्दीत मंडई उत्सव बाजार चौकात खुल्या जागेत असून रात्रीला मनोरंजनाकरिता नाटकांचे आयोजनसुद्धा केले आहे. पालांदूरच्या मंडईत विविध प्राण्यांची देखावे, हस्तकला, उंचच्या उंच ढाली, सजलेली दुकाने, पाहुण्यांची रेलचेल हिच ग्रामीण भागाची खरी श्रीमंती मंडईच्या निमित्ताने अनुभवायला मिळत आहे.