जिल्ह्याला मिळणार ३ हजार ६४४ क्विंटल साखर
By Admin | Updated: June 4, 2014 23:28 IST2014-06-04T23:28:15+5:302014-06-04T23:28:15+5:30
विदर्भातील ११ जिल्ह्यातील बीपीएल कुटुंबासाठी आगामी महिन्यामध्ये येणार्या उत्सवातंर्गत ३९ हजार ३८६ क्विंटल साखर मंजूर करण्यात आली आहे. यापैकी ३ हजार ६४४ क्विंटल साखर भंडारा जिल्ह्याला मिळणार आहे.

जिल्ह्याला मिळणार ३ हजार ६४४ क्विंटल साखर
बीपीएल धारकांना लाभ : विदर्भातील अन्य जिल्ह्यांनाही लाभ
लाखांदूर : विदर्भातील ११ जिल्ह्यातील बीपीएल कुटुंबासाठी आगामी महिन्यामध्ये येणार्या उत्सवातंर्गत ३९ हजार ३८६ क्विंटल साखर मंजूर करण्यात आली आहे. यापैकी ३ हजार ६४४ क्विंटल साखर भंडारा जिल्ह्याला मिळणार आहे. ही साखर १३.५0 रूपये किलो या दराने शिधापत्रिकाधारकांनी वितरित करण्यात येणार आहे.
साखर प्रती सदस्यात या सबंधाने जिल्हाधिकारी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सूचित करण्यात आल्याची माहिती प्राप्त आहे. पंधरवड्यात साखर उचलावी किंवा महिन्याची पूर्ण साखर उचलावी ही बाब संबंधित ग्राहक यांनी ठरवायचे आहे. ही साखर संबंधित स्वस्त धान्य दुकानदारांना मिळवून देण्याची जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकारी यांची आहे. ही साखर त्यांना मिळत नसेल तर त्यांच्या कारणासह वरिष्ठांना तशा सुचना कराव्या, असे निर्देश प्राप्त झाल्या आहेत. विदर्भातील ११ जिल्ह्यात बीपीएल कुटुंबाची संख्या बघता भंडारा जिल्ह्याला ३ हजार ६४४ क्विंटल, गोंदिया ३ हजार २११, चंद्रपूर ४ हजार १७६, गडचिरोली २ हजार ४0८, नागपूर जिल्हा ५ हजार २३0, ग्रामीण नागपूर २ हजार ७९0, शहर २ हजार ४४१, अमरावती विभागात १९ हजार ६४४, वर्धा १ हजार २५ क्विंटल साखर मंजूर करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात १ लक्ष ३९ हजार ६६२ क्विंटल साखर ऑक्टोबर महिन्यात बीपीएल शिधापत्रिकाधारकांना मिळणार आहे. त्यापैकी २८.१९ टक्के म्हणजे ३९ हजार ३६८ क्विंटल साखर विदर्भाच्या वाट्याला आली आहे. सध्या बाजारात ३२ ते ३४ किलो दराने ही साखर विक्री होत आहे.
सद्यस्थितीत शिधापत्रिकांना शिधा वेळेवर व पूर्णपणे उपलब्ध होत नसल्याच्या बोंबा सुरू असताना साखर वाटप बंद करण्यात आली. त्यामुळे शिधापत्रिका नावापुरते उरले होते. गहू, तेल, साखर, डाळ वाटपाचे प्रमाण शासनाने बंद व कमी केल्याने एकूणच गोरगरिबांचे हक्क हिरावून घेतल्याने पुढील काळात स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वाटप बंद होणार का, अशी भीती शिधापत्रिका धारकांमध्ये निर्माण झाली तर दुसरीकडे साखरेचे वाटप करण्याच्या शासन निर्णयाने दिलासा मिळणार आहे. (तालुका प्रतिनिधी)