लसीकरणात जिल्ह्याची आघाडी, राज्यात तिसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 05:00 IST2021-12-20T05:00:00+5:302021-12-20T05:00:52+5:30
जिल्ह्यात आठ लाख ९८ हजार ४०० नागरिकांचे लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. यापैकी पहिला डाेस घेणाऱ्यांची संख्या ८ लाख ६१ हजार ४४० असून, त्याची टक्केवरी ९५.८८ टक्के आहे, तर दुसरा डाेस सहा लाख ३३ हजार २८० व्यक्तींनी घेतला आहे. याची टक्केवारी ७०.४९ टक्के आहे. काेराेना विषाणूविरुध्द लढाईत लसीकरण महत्त्वाचा टप्पा आहे. काेराेनावर काेणतेही औषध नसून लस हाच एकमात्र उपाय आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, यासाठी प्रभावीपणे माेहीम राबविण्यात येत आहे.

लसीकरणात जिल्ह्याची आघाडी, राज्यात तिसरा
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : काेराेना विषाणूवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रभावीपणे माेहीम राबवित असून, लसीकरणात भंडारा जिल्ह्याने आघाडी घेत राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्यात पहिला डाेस घेणाऱ्यांची संख्या ९५ टक्के, तर दुसरा डाेस घेणाऱ्यांची संख्या ७० टक्के आहे. नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.
जिल्ह्यात आठ लाख ९८ हजार ४०० नागरिकांचे लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. यापैकी पहिला डाेस घेणाऱ्यांची संख्या ८ लाख ६१ हजार ४४० असून, त्याची टक्केवरी ९५.८८ टक्के आहे, तर दुसरा डाेस सहा लाख ३३ हजार २८० व्यक्तींनी घेतला आहे. याची टक्केवारी ७०.४९ टक्के आहे. काेराेना विषाणूविरुध्द लढाईत लसीकरण महत्त्वाचा टप्पा आहे. काेराेनावर काेणतेही औषध नसून लस हाच एकमात्र उपाय आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, यासाठी प्रभावीपणे माेहीम राबविण्यात येत आहे. १८ डिसेंबरपर्यंत जिल्ह्याने लसीकरणात निर्णायाक टप्पा गाठल्याची माहिती जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिली. जिल्हा प्रशासन, आराेग्य यंत्रणेच्या समन्वयाने लक्ष साध्य झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाने केलेले याेग्य व सुक्ष्म नियाेजनाचे हे फलित हाेय.
आस्थापनातील कर्मचाऱ्यांचा लसीकरणावर भर
- जिल्ह्यातील सर्व उद्याेग, कंपन्या, कारखाने, औद्याेगिक व खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे १०० टक्के लसीकरण करुन घेत आहेत. प्रशासनाने याबाबत सर्व आस्थापनांना निर्देश दिले आहेत. यासाेबतच लसीकरण नाही तर वेतन नाही, असा इशारा जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिला. त्यामुळे कर्मचारीही आता लस घेण्यास पुढे येत आहेत.
काेराेना कमी पण धाेका कायम
- जिल्ह्यात काेराेनाचा संसर्ग कमी असला तरी धाेका मात्र टळलेला नाही. शनिवारी एका ८० वर्षीय वृध्दाचा काेरोनाने मृत्यू झाला. तसेच जिल्ह्यात तीन ॲक्टिव्ह रुग्ण आहे. त्यामुळे नागरिकांनी काेराेना नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.