विधानसभा निवडणूक यशाचा जिल्हा काँग्रेसतर्फे जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:56 IST2018-12-12T00:55:40+5:302018-12-12T00:56:02+5:30
छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशाचा जल्लोष भंडारा जिल्हा काँग्रेस कमेटीतर्फे मंगळवारी करण्यात आला. येथील मुस्लिम लायब्ररी चौक आणि गांधी चौकात अतिषबाजी करून मिठाईचे वाटप करण्यात आले.

विधानसभा निवडणूक यशाचा जिल्हा काँग्रेसतर्फे जल्लोष
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशाचा जल्लोष भंडारा जिल्हा काँग्रेस कमेटीतर्फे मंगळवारी करण्यात आला. येथील मुस्लिम लायब्ररी चौक आणि गांधी चौकात अतिषबाजी करून मिठाईचे वाटप करण्यात आले.
छत्तीसगड, राजस्थान व मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांत उत्साह संचारला. या यशाचा जल्लोष करण्यासाठी गांधी चौक व मुस्लिम लायब्ररी चौकात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले. या ठिकाणी अतिषबाजी करून मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, अॅड.शशिर वंजारी, तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकपूर राऊत, शहर अध्यक्ष सचिन घनमारे, जिल्हा अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष अवैश पटेल, नगरपरिषद पक्ष नेता शमीम शेख, धनराज साठवणे, अनिक जमा पटेल, अजय गडकरी, मुकुंद साखरकर, अभिजीत वंजारी, इम्रान पठाण, पृथ्वी तांडेकर, सुहास गजभिये, इरफान पटेल, जीवन भजनकर, प्रवीण भोंदे, अयुब पटेल, विपुल खोब्रागडे आदी उपस्थित होते. काँग्रेसला मिळालेल्या या अभूतपूर्व यशामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.