शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

काेराेना संकटात जिल्हा बँकेतर्फे 137 काेटींचे पीक कर्जाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 5:00 AM

दरवर्षी पीक कर्जात अग्रेसर राहणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने यंदाही शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरण सुरू केले आहे. काेराेना संकटावर मात करीत आणि सर्व नियमांचे पालन करीत शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरित करण्यात येत आहे. जिल्हा बँकेला खरीप हंगामासाठी २८० काेटी ७८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. जिल्हा बँकेच्या ३९ शाखांमधून महिनाभरापासून पीक कर्ज वितरणाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत २४ हजार ८३९ शेतकऱ्यांना १३७ काेटी २६ लाख रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्यात आले.

ठळक मुद्दे२४ हजार ८३९ शेतकरी : महिनाभरात उद्दिष्टाच्या ४८ टक्के कर्ज वाटप

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा/पालांदूर : काेराेना संकटाच्या भीषण परिस्थितीत शेतकऱ्यांची बँक असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या २४ हजार ८३९ शेतकरी सभासदांना महिनाभरात १३७ काेटी २६ लाख रुपयांचे पीक कर्ज वितरित केले. उद्दिष्टाच्या ४८ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले असून, ही रक्कम शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा झाली. त्यामुळे काेराेना संकटात शेतकऱ्यांना माेठा दिलासा मिळाला आहे.दरवर्षी पीक कर्जात अग्रेसर राहणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने यंदाही शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरण सुरू केले आहे. काेराेना संकटावर मात करीत आणि सर्व नियमांचे पालन करीत शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरित करण्यात येत आहे. जिल्हा बँकेला खरीप हंगामासाठी २८० काेटी ७८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. जिल्हा बँकेच्या ३९ शाखांमधून महिनाभरापासून पीक कर्ज वितरणाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत २४ हजार ८३९ शेतकऱ्यांना १३७ काेटी २६ लाख रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्यात आले. हे कर्ज उद्दिष्टाच्या ४८ टक्के आहे. विशेष म्हणजे गतवर्षी जिल्हा बँकेने काेराेना संकटात उद्दिष्टापेक्षा अधीक पीक कर्ज वितरित केले हाेते.सर्वत्र काेराेनाचे संकट घाेंगावत आहे. अशा स्थितीत आगामी हंगामासाठी पीक कर्ज मिळेल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत हाेती. मात्र जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी या काेराेना संकटात याेग्य नियाेजन करून शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरित करणे सुरू केले आहे. शेतकऱ्यांना तत्परतेने पीक कर्ज मिळावे, यासाठी त्यांनी माेहीम उभारली. अवघ्या महिनाभरात उद्दिष्टाच्या अर्धे पीक कर्ज वितरित करण्यात आले. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा हाेत असल्याने माेठा दिलासा मिळाला आहे. काेराेनासंकटात शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जाण्यापासून वाचविण्यात आले आहे. पीक कर्ज घेत ३१ मार्चपर्यंत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ० व्याज दराचा लाभ देण्यात येत आहे. ओलिताखालील शेतकऱ्यांना प्रति एकर २१ हजार ७५० रुपये तर काेरडवाहू शेतकऱ्यांना १९ हजार रुपये पीक कर्जाचे प्रमाण ठरविण्यात आले आहे.लाॅकडाऊनच्या काळात कर्मचारी अधिकाऱ्यांनी जाेखीम पत्करून निर्धारित वेळेपेक्षा अधिक काम केले, हे विशेष. 

पालांदूर सेवा सहकारी संस्था अग्रेसर- पीक कर्ज वाटपात लाखनी तालुक्यातील पालांदूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अग्रेसर आहे. ३१ मार्चपर्यंत पीक कर्जाची वसूली ९३.२३ टक्के केली. ४४२ शेतकऱ्यांना ० टक्के व्याज दराचा लाभ मिळाला. १५ एप्रिलपासून पीक कर्ज वाटपाला सुरुवात झाली असून, ३०८ शेतकऱ्यांना एक काेटी ४५ लाख ७३ हजार ४०० रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आल्याची माहिती संस्थाध्यक्ष विजय कापसे व गटसचिव सुनील कापसे यांनी दिली. 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत १५ एप्रिलपासून पीक कर्ज वितरणाला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी सेवा सहकारी संस्थेमार्फत पीक कर्जाच्या वितरणाची माहिती घेत बँकेत हाेणारी गर्दी टाळावी. सेवा सहकारी संस्थांनी आपले ताळेबंद बँकेत सादर केल्याशिवाय दरखास्त पाठवू नये. काेराेनाचे नियम पाळून बँकिंग व्यवहाराला सहकार्य करावे.- सुनील फुंडे,जिल्हा मध्यवर्ती बॅंक, भंडारा

 

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज