जिल्ह्यात २४ तासात ७३.१ मिमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 06:00 IST2020-01-10T06:00:00+5:302020-01-10T06:00:29+5:30
लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात बुधवारी सायंकाळी अचानक गारांचा वर्षाव झाला. या गारपीटीने परिसरातील हरभरा, लाखोरी, उडीद, मूग आदी पिकांचे नुकसान झाले. बुधवारच्या रात्रीसुध्दा अवकाळी पावसाने परिसराला झोडपून काढले. दमट हवामानामुळे पीकांवर कीड येण्याची शक्यता आहे. त्यासाठी उपाययोजना करावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे यांनी केले आहे.

जिल्ह्यात २४ तासात ७३.१ मिमी पाऊस
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हावर नैसर्गिक संकटांचे ढग दूर व्हायचे नाव घेत नाही. महिनाभरात सहावेळा अवकाळी पावसाचा फटका बसला असून गत २४ तासात ७३.१ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस लाखनी मंडळात ३७.६ मिमी नोंदला गेला. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
दिवाळीपासून जिल्ह्यावर नैसर्गिक संकट कोसळत आहे. ऐन काढणीला आलेला धान दिवाळीच्या काळात उद्ध्वस्त झाला होता. त्यानंतर १५ डिसेंबर ते ८ जानेवारी या महिनाभराच्या काळात जिल्ह्यात सा वेळा अवकाळी पावसाचा फटका बसला. १५ डिसेंबर रोजी १० मिमी, २५ डिसेंबर रोजी १५ मिमी, २६ डिसेंबर रोजी ५ मिमी, ३१ डिसेंबर रोजी ६४.८ मिमी, १ जानेवारी रोजी १०.६ मिमी, २ जानेवारी रोजी ६६.६७ मिमी पावसाची नोंद झाली होती. आता अवकाळी पाऊस विश्रांती घेईल असे वाटत असतांना ७ जानेवारी रोजी पुन्हा अवकाळी पाऊस बरसला.
गत २४ तासात जिल्ह्यात ७३.१ मिमी पावसाची नोंद झाली. त्यात भंडारा तालुक्यातील शहापूर मंडळात १७ मिमी, भंडारा १६.२ मिमी, धारगाव १८ मिमी, बेला १४.३ मिमी, पहेला ३५.७ मिमी, खमारी २० मिमी, मोहाडी तालुक्यातील मोहाडी मंडळात १९.१ मिमी, वरठी ७.४ मिमी, करडी १६.१ मिमी, कन्हाळगाव २०.२ मिमी, आंधळगाव ६.३ मिमी, तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी मंडळात ८.३ मिमी, तुमसर ८.३ मिमी, सिहोरा १४.२ मिमी, मिटेवानी ५.२ मिमी गर्रा १५ मिमी, पवनी तालुक्यातील अड्याळ मंडळात १५.२ मिमी, कोंढा २.२ मिमी, पवनी ३.४ मिमी, चिचाळ १३.३ मिमी, आसगाव ४.२ मिमी, आमगाव २.१ मिमी, साकोली तालुक्यातील साकोली मंडळात ३५.२ मिमी, एकोडी २४.२ मिमी, सानगडी ३१ मिमी, लाखांदूर तालुकयातील लाखांदूर मंडळात ८.२ मिमी., बारव्हा ७.२ मिमी, मासळ ७.४ मिमी, विरली ५.२ मिमी तर लाखनी तालुक्यातील पोहरा मंडळात १७.८ मिमी, लाखनी ३७.६ मिमी, पालांदूर २१.२ मिमी, पिपंळगाव ३५.१ मिमी पावसाची नोंद झाली.
या पावसाने गहू, हरभरा, वटाणा यासह रबी पिकांचे नुकसान झाले. तसेच आधारभूत केंद्रावर उघड्यावर असलेल्या धानही ओला झाला. महिनाभरात शेतकऱ्यांना सहादा अवकाळी पावसाचा फटका बसल्याने शेतकरी मेटाकुटीस आल्याचे दिसत आहे.
साकोली व पालांदूरमध्ये गारांचा वर्षाव
पालांदूर : लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात बुधवारी सायंकाळी अचानक गारांचा वर्षाव झाला. या गारपीटीने परिसरातील हरभरा, लाखोरी, उडीद, मूग आदी पिकांचे नुकसान झाले. बुधवारच्या रात्रीसुध्दा अवकाळी पावसाने परिसराला झोडपून काढले. दमट हवामानामुळे पीकांवर कीड येण्याची शक्यता आहे. त्यासाठी उपाययोजना करावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे यांनी केले आहे. साकोली तालुक्यात बुधवारी दुपारी अवकाळी पावसाने फटका दिला. त्यानंतर रात्री ११.३० वाजताच्या सुमारास काही गावांमध्ये बोराच्या आकाराच्या गारांचा वर्षाव झाला. सततच्या अवकाळी पावसाने शेतकरी धास्तावले आहेत. गहू, हरभरा पिकांचे नुकसान होत आहे. फुलांवर आलेल्या तुरीची फुले गळून पडत आहेत. तालुक्यात उघड्यावर असलेला धानही ओला झाला आहे. गत महिनाभरात सहा वेळा अवकाळी पावसाचा फटका बसला. शासनाने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकºयांना तातडीने मदत करावी अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहेत.