गायमुख येथे प्रफुल्ल पटेलांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण
By Admin | Updated: March 9, 2016 01:41 IST2016-03-09T01:41:59+5:302016-03-09T01:41:59+5:30
महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर प्रसिद्ध तिर्थक्षेत्र गायमुख येथे खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

गायमुख येथे प्रफुल्ल पटेलांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण
मोहाडी : महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर प्रसिद्ध तिर्थक्षेत्र गायमुख येथे खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार राजेंद्र जैन, मनोहरभाई पटेल अॅकेडमीच्या वर्षा पटेल, नरेश माहेश्वरी, देवेंद्रनाथ चौबे, देवचंद ठाकरे, विठ्ठल कहालकर, शुभांगी रहांगडाले, धनेंद्र तुरकर, सुरेश रहांगडाले, के.बी. चौरागडे, राजू कारेमोरे, संजय केवट, चंद्रेश दवे, मसराम, संजय आगाशे आदी उपस्थित होते. यावेळी पटेल यांनी भोळ्या शंकराचे दर्शन घेऊन भाविकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी खा.पटेल म्हणाले, भाविकांना महाप्रसादाचे वितरण करणे हे एक पुण्याचे काम आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा तसेच पदाधिकाऱ्यांनी भाविकांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असेही सांगितले. खा.प्रफुल पटेल, वर्षा पटेल, आमदार राजेंद्र जैन यांनी भाविकांना स्वत: महाप्रसादाचे वितरण केले. (शहर प्रतिनिधी)