जंगलव्याप्त गावातील गॅस जोडणी वाटप रखडले
By Admin | Updated: September 17, 2014 23:36 IST2014-09-17T23:36:29+5:302014-09-17T23:36:29+5:30
जंगल व्याप्त गावातील गॅस कनेक्शन वाटप रखडले आहे. तुमसर, मोहाडी तालुक्यातील जंगल व्याप्त लाभार्थ्यांना आतापर्यंत का मिळाला नाही, असा प्रश्न निर्माण होतो. त्याची उत्तरे समाधानकारक वनविभागाकडून

जंगलव्याप्त गावातील गॅस जोडणी वाटप रखडले
भंडार : जंगल व्याप्त गावातील गॅस कनेक्शन वाटप रखडले आहे. तुमसर, मोहाडी तालुक्यातील जंगल व्याप्त लाभार्थ्यांना आतापर्यंत का मिळाला नाही, असा प्रश्न निर्माण होतो. त्याची उत्तरे समाधानकारक वनविभागाकडून मिळालेली नाही. याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.
जंगल परिसरातील नागरिकांना, कुटूंबांना दारिद्रचे व गरीबीचे जीवन जगावे लागते, त्यांना वनविभागाकडून मदत व्हावी, वनाचे रक्षण व्हावे या उद्देशाने राज्यस्तरीय वन विशेष घटक योजना संरक्षीत वनक्षेत्राअंतर्गत ७५ टक्के अनुदानीत तत्वावर नवीन गॅस कनेक्शन योजने काम सन २०१२-१३ मध्ये वनविभागाने गावस्तरावरील वनसमितीच्या माध्यमातून शासनातर्फे योजना अंमलात आणण्यासाठी व गॅस कनेक्शनचा लाभ मिळण्यासाठी प्रत्येक कुटूंबाला प्रति २४६० रूपये भरण्याचे सांगितले, त्यात पहिल्या वर्षी १२ गॅस सिलिंडर फ्री, दुसऱ्या वर्षी ८ गॅस सिलेंडर फ्री, तिसऱ्या वर्षी ४ गॅस सिलिंडर फ्री असे सांगण्यात आले. त्यामुळे जंगल व्याप्त कुटूंबांनी ही योजना मिळावी म्हणून रक्कम भरली. ही रक्कम वन विभागाच्या खात्यात करोडो रूपयाच्या संख्येत जमा झाली, परंतु आज दीड वर्ष होऊनही या योजनेचा लाभ तुमसर, मोहाडी तालुक्यातील जंगल व्याप्त लाभार्थ्यांना आतापर्यंत का मिळाला नाही, असा प्रश्न निर्माण होतो. त्याची उत्तरे समाधानकारक वनविभागाकडून मिळालेली नाही. याची चौकशी व्हावी, अशी मागणी विजय शहारे व कार्यकर्त्यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)