सोनेगाव येथे गरजूंना अन्न धान्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 05:00 AM2020-04-09T05:00:00+5:302020-04-09T05:00:33+5:30

लॉकडाऊनमुळे सर्वाधिक फटका हातावर रोजीरोटी करणाऱ्या लोकांवर बसला आहे. गावागावात फिरून औषधी, खेळणी व इतर लहान वस्तू विकूण उदरनिर्वाह करणारे भटके समाज जिथल्या तिथे अडले आहे. अस्थायी झोपडी बांधून गावाच्या बाहेर खाली जागेत थांबत असतात. कोंढा गावाजवळील सोनेगाव बुटी येथे खापा जिल्हा नागपूर येथील चव्हाण, यादव आडनावाचे दहा कुटुंब थांबले असल्याची माहिती मिळताच माजी सरपंच गंगाधराव जिभकाटे यांनी संकटाकलीन परिस्थितीत मदतीचा हात देवून अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले.

Distribution of food grains to needy at Sonegaon | सोनेगाव येथे गरजूंना अन्न धान्याचे वाटप

सोनेगाव येथे गरजूंना अन्न धान्याचे वाटप

Next
ठळक मुद्देसामाजिक बांधिलकी : भटक्या समाजाच्या दहा कुटुंबांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
कोंढा (कोसरा) : कोरोना महामारीमुळे देशभरात सर्वत्र लॉकडाऊन केल्याने गावागावात फिरणारे भटक्या समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. सोनेगाव बुटी येथे झोपड्या बांधून थांबलेल्या भटक्या समाजाच्या दहा कुटुंबाला सामाजिक बांधिलकी जोपासत माजी सरपंच गंगाधरराव जिभकाटे यांनी अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले.
लॉकडाऊनमुळे सर्वाधिक फटका हातावर रोजीरोटी करणाऱ्या लोकांवर बसला आहे. गावागावात फिरून औषधी, खेळणी व इतर लहान वस्तू विकूण उदरनिर्वाह करणारे भटके समाज जिथल्या तिथे अडले आहे. अस्थायी झोपडी बांधून गावाच्या बाहेर खाली जागेत थांबत असतात. कोंढा गावाजवळील सोनेगाव बुटी येथे खापा जिल्हा नागपूर येथील चव्हाण, यादव आडनावाचे दहा कुटुंब थांबले असल्याची माहिती मिळताच माजी सरपंच गंगाधराव जिभकाटे यांनी संकटाकलीन परिस्थितीत मदतीचा हात देवून अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले. दहा कुटुंबाला १० किलो तांदूळ तसेच गहू, दाळ व इतर वस्तूचे वाटप केले. त्यामुळे भटक्या समाजाच्या लोकांनी याबद्दल समाधान व्यस्त केले.
सोनेगाव बुटी येथे जाऊन गंगाधरराव जिभकाटे यांना अन्नधान्य वाटप अमित जिभकाटे, निलेश सावरबांधे, गिरीधर कोहपरे, मायानंद नंदागळवळी, जगदिश शिंगाडे, सुधाकर कोहपरे यांनी मदत वाटप करण्यात सहकार्य केले. या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Web Title: Distribution of food grains to needy at Sonegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.