शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

येरली पाणीपुरवठा योजनेची वीज खंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2016 00:47 IST

थकीत वीज देयकापोटी येरली प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची वीज पुरवठा तीन दिवसापुर्वी खंडीत करण्यात आला.

दोन लाखांचा वीज देयक : दूषित पाणी पिण्यास बाध्यतुमसर : थकीत वीज देयकापोटी येरली प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची वीज पुरवठा तीन दिवसापुर्वी खंडीत करण्यात आला. आठ गावांना शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा या योनेअंतर्गत करण्यात येत होते. महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने ही योजना जिल्हा परिषदेला दोन वर्षापुर्वी हस्तांतरीत केली होती. या योजनेवर सुमारे दोन लक्षाचा वीज देयक थकीत आहे.तुमसर तालुक्यातील येरली येथे महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने पाच वर्षापुर्वी तीन कोटी रूपये खर्च करून आठ गावांकरीता पाणीपुरवठा योजना तयार केली होती. ही योजना चालविण्याकरिता जीवन प्राधीकरण इच्छुक नव्हते. राजेश पटले यांनी शिखर समिती स्थापन केली होती. या समितीचे सदस्य म्हणून पंचायत समिती, सदस्य हिरालाल नागपूर सह इतर सदस्य होते. मागील दोन ते अडीचवर्षे ही योजना सुरळीत सुरू होती. दोन वर्षापासून या योजनचे दोन लक्ष रूपयांचे वीज बिल थकीत होते. मुख्य अभियंत्यांनी तीन दिवसापुर्वी या योजनेचा वीज पुरवठा खंडीत करण्याचा आदेश सिहोरा येथील वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यांना दिला. त्या अनुषंगाने सदर योजनेचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. येरली प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत येरली, मोहगाव, सिलेगाव, हरदोली, कर्कापूर, तामसवाडी सि. रणेरा, डोंगरला ही गावे येतात. सुमारे १२ ते १४ हजार नागरिकांना ही योजना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवठा करते. मागील तीन दिवसापासून येथे नागरिकांना विहीरींचे दूषित पाणी प्यावे लागत आहे. (तालुका प्रतिनिधी)पाणी शिखर समिती सदस्य व संबंधित गावातील ग्रामपंचायत नागरिकांकडून पाणी कर वसुल करून ही योजना चालवित होती. शासनाचा अनुदान येथे मिळत नव्हते. जिल्ह्यातील एकमेव सुरळीत सुरू असणारी ही योजना होती. तिलाही आता ग्रहण लागले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने कोट्यवधींचा निधी खर्च करून योजना तयार केल्या. परंतु त्या चालवायच्या कुणी याचा पत्ता नसल्याने योजना भंगारात निघाल्या आहेत.- एन.एच. झलके, कनिष्ठ अभियंता वीज वितरण कंपनी सिहोरादुष्काळसदृश्य स्थिती असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांकडे पैसा नाही त्यामुळे पाणी कर गोळा झाला नाही. जिल्हा परिषदेत सत्ता बदल झाली. पदाधिकाऱ्यांनी येथे निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.- हिरालाल नागपूरे, गटनेता पंचायत समिती तुमसर.