तुमसर नगर परिषदेतील वाद पोहोचला पोलीस ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 05:00 IST2020-04-18T05:00:00+5:302020-04-18T05:00:48+5:30

देशात सर्वत्र कोरोना विषाणूच्या संसर्गाची धास्ती आहे. सर्वत्र लॉकडाऊन आहे. दरम्यान ९ एप्रिल रोजी नगर परिषदेअंतर्गत येत असलेल्या प्रभाग क्रमांक ५ मध्ये काही मजूर काम करीत असल्याचे नगराध्यक्ष व बांधकाम सभापतीच्या निदर्शनास आले. त्यांनी बांधकामस्थळी भेट दिली असता मजुरांनी पळ काढला. १३ एप्रिल रोजी बांधकाम अभियंत्यांनी सदर काम पुर्ण झाल्याचे आठ ते दहा एमबी व फार्म ६४ घेवून नगराध्यक्षाच्या कक्षात आले.

The dispute between the Tumsar city council was reached at the police station | तुमसर नगर परिषदेतील वाद पोहोचला पोलीस ठाण्यात

तुमसर नगर परिषदेतील वाद पोहोचला पोलीस ठाण्यात

ठळक मुद्देमुख्याधिकाऱ्यांनी केली नगराध्यक्षांची तक्रार : काम न करता बिलाची उचल केल्याचा प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : कोणतेही काम न करता मुख्याधिकारी बिल काढून घेत असल्याचे तुमसर नगराध्यक्षांच्या लक्षात आले. त्यावरुन त्यांनी एमबी रेकॉर्ड आपल्या ताब्यात ठेवले. यावरुन मुख्याधिकाऱ्यांनी नगराध्यक्षाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकाराने तुमसर शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी प्रकरण चौकशीत ठेवले आहे.
देशात सर्वत्र कोरोना विषाणूच्या संसर्गाची धास्ती आहे. सर्वत्र लॉकडाऊन आहे. दरम्यान ९ एप्रिल रोजी नगर परिषदेअंतर्गत येत असलेल्या प्रभाग क्रमांक ५ मध्ये काही मजूर काम करीत असल्याचे नगराध्यक्ष व बांधकाम सभापतीच्या निदर्शनास आले. त्यांनी बांधकामस्थळी भेट दिली असता मजुरांनी पळ काढला. १३ एप्रिल रोजी बांधकाम अभियंत्यांनी सदर काम पुर्ण झाल्याचे आठ ते दहा एमबी व फार्म ६४ घेवून नगराध्यक्षाच्या कक्षात आले. नगराध्यक्ष पडोळे यांनी त्याची पाहणी केली असता कामच झाले नाही तर बिल कसे काय काढता, असे अभियंत्याला सांगितले. तसेच मुख्याधिकारी अर्चना मेंढे यांना आपल्या कक्षात येण्यास सांगितले. परंतु त्या आल्या नाही. त्यामुळे नगराध्यक्ष व बांधकाम अभियंता काही कर्मचाºयांना सोबत घेवून शहरातील विविध प्रभागातील बांधकामाची पाहणी केली.
नगराध्यक्षांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन त्यावर नगर परिषद कर्मचाºयांच्या स्वाक्षºया घेतल्या. पंचनामा व एमबी रेकार्डमध्ये खोडतोड होऊ नये म्हणून त्यानी आपल्या कस्टडीत सील करुन ठेवले. तसेच जिल्हाधिकारी व तत्सम अधिकाºयांना माहिती दिली. त्यात मुख्याधिकारी अर्चना मेंढे यांचाही समावेश होता. दरम्यान आपले बिंग फुटेल या धास्तीने मुख्याधिकारी मेंढे यांनी शुक्रवारी दुपारी नगराध्यक्ष शासकीय कामात अडथळा निर्माण करीत असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. मुख्याधिकाºयांचा हा प्रकार म्हणजे उलट्या बोंबा असल्याचे तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी सांगितले.

सर्व कामांचे फोटो व पुर्णत्वाचे पत्र पाहून बिल काढण्यासाठी पाठविण्यात आले. मात्र नगराध्यक्षांना कोणताही अधिकार नसताना लेखापालावर दबाव आणून एमबी रेकॉर्ड ताब्यात घेतले. मागणी केल्यावरही दिले नाही. त्यामुळे तक्रार करण्यात आली. पोलिसांनी प्रकरण चौकशीत ठेवले आहे.
- अर्चना मेंढे
मुख्याधिकारी, नगर परिषद तुमसर

Web Title: The dispute between the Tumsar city council was reached at the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.