ओबीसी आरक्षण, धान घोटाळा आणि रेती चोरीवर राज्यपालांशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:37 IST2021-03-27T04:37:12+5:302021-03-27T04:37:12+5:30
ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने राजकीय सामाजिक व सांस्कृतिक प्रगती खोळंबण्याची भीती आहे. राज्य शासनाने ओबीसी आरक्षण कायदा तातडीने लागू ...

ओबीसी आरक्षण, धान घोटाळा आणि रेती चोरीवर राज्यपालांशी चर्चा
ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने राजकीय सामाजिक व सांस्कृतिक प्रगती खोळंबण्याची भीती आहे. राज्य शासनाने ओबीसी आरक्षण कायदा तातडीने लागू करावा आणि महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल करण्याबाबत सूचना द्यावी, अशी विनंती राज्यपालांना यावेळी करण्यात आली. धानाचे कोठार म्हणून भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. धान विकताना शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. मोठ्या प्रमाणात शासनाची आर्थिक फसवणूक केली जाते. या धान घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करावी, तसेच भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत आहे. शासनाचा महसूल बुडत आहे. आपण मंत्रालय स्तरावर आणि विधीमंडळात या प्रश्नावर वाचा फोडली. परंतु कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे आपण यावर लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी राज्यपालांकडे करण्यात आली. या सर्व प्रश्नांवर आपण स्वत: जातीने लक्ष घालून पाठपुरावा करू, असे आश्वासन राज्यपाल कोश्यारी यांनी दिले.