शिक्षकांच्या समस्याबाबत वेतन पथक अधीक्षकांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 05:00 AM2020-05-30T05:00:00+5:302020-05-30T05:01:00+5:30

मात्र वेतनाशी संबंधी मुख्य लिपिकाने ऐनवेळी सभेला दांडी मारल्यामुळे अद्ययावत माहिती न मिळाल्याने संघटनेनी नाराजी व्यक्त करुन मुख्य लिपिकाचा निषेध ठराव पारित करण्यात आला. यापुढे वेतनसंबंधी अद्यावत माहिती व सर्व समस्या निकाली काढण्याचे आश्वासन माध्यमिक वेतन पथक अधीक्षक प्रतिभा मेश्राम यांनी संघटनेला दिले.

Discussion with the pay team superintendent regarding the problem of teachers | शिक्षकांच्या समस्याबाबत वेतन पथक अधीक्षकांशी चर्चा

शिक्षकांच्या समस्याबाबत वेतन पथक अधीक्षकांशी चर्चा

Next
ठळक मुद्देबैठकीला मुख्य लिपिकाची दांडी : भ्रष्टाचाराचे प्रकरण भंडारा जिल्हा समन्वय समितीचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : खाजगी अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक, सैनिकी शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांच्या वेतना संबंधित विविध प्रलबिंत समस्याचे निरसन करण्याकरिता अधीक्षक वेतनपथक माध्यमिक यांचे दालनात भंडारा जिल्हा शालेय शिक्षण कर्मचारी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली.
मात्र वेतनाशी संबंधी मुख्य लिपिकाने ऐनवेळी सभेला दांडी मारल्यामुळे अद्ययावत माहिती न मिळाल्याने संघटनेनी नाराजी व्यक्त करुन मुख्य लिपिकाचा निषेध ठराव पारित करण्यात आला.
यापुढे वेतनसंबंधी अद्यावत माहिती व सर्व समस्या निकाली काढण्याचे आश्वासन माध्यमिक वेतन पथक अधीक्षक प्रतिभा मेश्राम यांनी संघटनेला दिले.
खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक व सैनिकी शाळेतील शिक्षकांच्या वेतनसंबंधित अनेक प्रलंबित समस्या निकाली काढणे व वेतन पथक कार्यालयातील वाढत्या भ्रष्टाचारावर आळा घालून लोकशाही मागार्ने पारदर्शक कामाचा आढावा घेण्यासाठी भंडारा जिल्हा समन्वय समितीच्या शिष्टमंडळासोबत सोशल डिस्टन्सचे सर्व नियम पाळून बैठकिचे आयोजन करण्यात आले होते.
माध्यमिकचे वेतन पथक कार्यालय सध्या भ्रष्टाचाराचे केंद्रबिंदू बनले असून शिक्षकांचे नियमित वेतन, शालार्थ आयडी प्रस्ताव प्रकरणे, जिपीएफ पावती वितरित करणे, थकीत वेतन, अर्जित रजा रोखीकारण, वैधकीय देयके, जीपीएफ परतावा, आदी अनेक तक्रारी संघटनेकडे प्राप्त झाल्या आहेत. यावेळी समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ.उल्हास फडके, जिल्हाकार्यवाह राजेश धुर्वे, अंगेश बेहेलपांडे, सुधाकर देशमुख, सैंनपाल वासनिक, विलास खोब्रागडे तसेच वेतन पथकचे लेखासहाय्यक ए.एम.पालकर, कनिष्ठ लिपिक प्रितम पिसे उपस्थित होते.

सध्यास्थितीत कार्यालयीन कामाचा व्याप व शिक्षकांचे वेतनसंबंधी संघटनेची सभा असल्याने आपण अद्यावत माहितीसह उपस्थित राहण्याबाबत सूचना केली होती. मात्र रजा मंजूर करायची असेल तर करा अथवा नका करू, असे उलट उत्तर देत रजेचा अर्ज ठेवून गेले. त्याच वेळी अर्ज नामंजूर करण्यात आले.
-प्रतिभा मेश्राम, अधीक्षक, वेतन निधी पथक माध्यमिक, भंडारा.

Web Title: Discussion with the pay team superintendent regarding the problem of teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.