नवीन शैक्षणिक धोरणावर चर्चासत्र

By Admin | Updated: October 29, 2015 01:08 IST2015-10-29T01:08:19+5:302015-10-29T01:08:19+5:30

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निश्चित करण्याकरिता आयोजित जिल्हास्तरीय चर्चासत्र शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे ...

Discussion on new education policy | नवीन शैक्षणिक धोरणावर चर्चासत्र

नवीन शैक्षणिक धोरणावर चर्चासत्र

अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन : प्रादेशिक असमतोल दूर करण्यावर भर
भंडारा : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निश्चित करण्याकरिता आयोजित जिल्हास्तरीय चर्चासत्र शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पाटील यांच्या अध्यक्षतेत व जे.एम.पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांच्या उपस्थितीत बुधवारला जे.एम. पटेल महाविद्यालयात पार पडले. या कार्यक्रमासाठी राज्य शासनाने डॉ.पाटील व डॉ.ढोमणे यांची जिल्हा नोडल अधिकारी म्हणून निवड केली आहे.
प्राचार्य पाटील म्हणाले, देशाच्या सर्वांगिण विकासासाठी २१ व्या शतकातील देश व समाजापुढील आव्हाने लक्षात घेऊन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निश्चित करण्यात येत आहे. उच्च शिक्षणात प्रादेशिक विषमता मोठ्या प्रमाणात आहे. ही विषमता दूर करण्यासाठी सर्वसामान्यांची मते नोंदविण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. विकास ढोमणे यांनी चर्चासत्रादरम्यान नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी आखण्यात आलेल्या प्रश्नावलीची माहिती देताना कौशल्याभिमुख अभ्यासक्रम राबवायचे कां?, उच्च शिक्षणामध्ळे कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश करता येईल कां?, प्रादेशिक असमतोल दूर करणे, सामाजिक दरी दूर कशी करता येईल? शिष्यवृत्ती आर्थिक परिस्थितीवर देता येईल का? शैक्षणिक कर्ज गुणवत्तेनुसार दिली पाहिजे का? याबद्दल सांगितले. यावेळी चर्चेच्या माध्यमातून उपाय सूचविण्याचे उपस्थितांना आवाहन केले.
या सभेत नवीन शैक्षणिक धोरण निशिचत करण्यासाठी घेण्यात आलेल्या मतांमध्ये जिल्ह्यातील विद्यार्थी, शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी, शैक्षणिक सत्राशी संबंधित व्यक्ती, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, औद्योगिक लोकप्रतिनिधी आदी घटकांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यांच्याकडून प्राप्त माहिती ३० आॅक्टोबर रोजी शासनाकडे माहिती सादर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी आर.एम. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जुल्फी शेख, एम.बी. पटेल अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संगीता लोही, डॉ. अमोल पदवाड, डॉ. कार्तिक पन्नीकर, डॉ. प्रदीप मेश्राम यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: Discussion on new education policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.