पोपटाची पिल्ले शोधने जिवावर बेतले; झाडावरून पडून आठ वर्षीय बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 11:09 IST2021-03-14T11:08:57+5:302021-03-14T11:09:06+5:30
१२ मार्च रोजी कृणाल काही मित्रासोबत पोपटाची पिल्ले शोघण्यासाठी रानात गेला होता. उंच झाडावर चढून घरटातून पोपटाची पिल्ले काढण्याचा प्रयत्न करत होता.

पोपटाची पिल्ले शोधने जिवावर बेतले; झाडावरून पडून आठ वर्षीय बालकाचा मृत्यू
एकोडी (भंडारा): घरट्यातील पोपटाची पिल्ले शोधण्यासाठी गेलेल्या आठ वर्षीय बालकाचा झाडावरून पडून मृत्यू झाल्याची घटना सकोली तालुक्याती एकोडी येथे घडली. शुक्रवारी झाडावरुन पडून जखमी झाल्यानंतर रविवारी पहाटे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
कृणाल शिसुपाल जांभुळकर (८ ) असे मृत बालकाचे नाव आहे. तो जिल्हा परिषद शाळेत ३ वर्गात शिकत होता. खोडकर स्वभावाचा कृणाल शाळा बंद असल्याने दिवसभर शेतशिवारात भटकत असे.
१२ मार्च रोजी कृणाल काही मित्रासोबत पोपटाची पिल्ले शोघण्यासाठी रानात गेला होता. उंच झाडावर चढून घरटातून पोपटाची पिल्ले काढण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी तो तोल जाऊन खाली कोसळला. परिसरातील शेतातील शेतकरी धावून आले. त्याला उपचारासाठी पळसगाव येथे नेण्यात आले. परंतु रविवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. कृणालच्या वडिलांचा एक वर्षापूर्वी आकस्मिक मृत्यू झाला होता.