शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
2
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
3
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
4
मिचेल स्टार्कचा भेदक मारा, राहुल त्रिपाठी लढला! KKR समोर SRH २० षटकंही नाही टिकला
5
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
6
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
7
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
8
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
9
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
10
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
11
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
12
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
13
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
14
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

बावनथडी प्रकल्पातून ७० दलघमी पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 5:00 AM

महाराष्ट्र-मध्यप्रदेशाच्या सीमेवर असलेल्या आंतरराज्यीय प्रकल्प शेतकºयांसाठी वरदान ठरणारा आहे. यंदा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुबलक पाऊस झाला. त्यामुळे हा प्रकल्प तब्बल आठ वर्षानंतर ९५ टक्के भरला आहे. यापुर्वी या प्रकल्पातून पऱ्हे वाचविण्यासाठी २५ दिवस पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. आगामी उन्हाळी पिकांसाठीही या प्रकल्पातून शेतकऱ्यांना पाणी मिळणार असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली आहे.

ठळक मुद्देप्रकल्पात विक्रमी ९५ टक्के जलसाठा, दोनही राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी होतोय लाभ

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : यंदा झालेल्या मुबलक पावसाने आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्प तुडूंब भरले असून सद्यस्थिती या प्रकल्पात विक्रमी ९५ टक्के जलसाठा आहे. आतापर्यंत या प्रकत्पातून ७० दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. याचा फायदा महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशासाठी शेतकऱ्यांना सिंचनासाठी होत आहे.महाराष्ट्र-मध्यप्रदेशाच्या सीमेवर असलेल्या आंतरराज्यीय प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा आहे. यंदा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुबलक पाऊस झाला. त्यामुळे हा प्रकल्प तब्बल आठ वर्षानंतर ९५ टक्के भरला आहे. यापुर्वी या प्रकल्पातून पऱ्हे वाचविण्यासाठी २५ दिवस पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. आगामी उन्हाळी पिकांसाठीही या प्रकल्पातून शेतकऱ्यांना पाणी मिळणार असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली आहे. आतापर्यंत या प्रकल्पातून ७० दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा झाला आहे.प्रकल्पाचे अधिकारी पाणी विसर्गादरम्यान व मुख्य कालवा व इतर माईनरवर लक्ष ठेवून आहे. तुमसर व मोहाडी तालुक्यातील सर्व मायनर सध्या सुरू आहे. पुढील आदेशापर्यंत पाण्याचा विसर्ग सुरू राहणार आहे. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा हा प्रकल्प ऑगस्ट महिन्यात मात्र कर्दनकाळ ठरला होता. महापुराने नदीतीरावरील अनेक गावे आणि शेती जलमय झाली होती. शेतकऱ्यांचे यात मोठे नुकसान झाले आहे.दोनही राज्यांसाठी पाण्याचा विसर्गबावनथडी प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात येणाऱ्या महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील शेतकºयांसाठी पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. हा प्रकल्प दोनही राज्यांसाठी वरदान असून तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील शेतकºयांना याचा मोठा फायदा होत आहे. आतापर्यंत या प्रकल्पातून ७० दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले असून सर्व मायनरने पाणी सिंचनाकरीता देण्यात येत असल्याची माहिती बावनथडी प्रकल्पाचे अभियंता आर.आर. बडोले यांनी दिली आहे. यंदा हा प्रकल्प तुडूंब भरल्याने उन्हाळी धान पिकालाही त्याचा फायदा होणार आहे. केवळ कालव्यांची डागडुजी आणि दुरूस्ती करण्याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. पूर्ण क्षमतेने सिंचनासाठी पाणी सोडल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्चितच भर पडणार आहे. लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :Bavanthadi Projectबावनथडी प्रकल्पIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प