अतिवृष्टीग्रस्त घरकुलापासून वंचित
By Admin | Updated: March 17, 2017 00:35 IST2017-03-17T00:35:42+5:302017-03-17T00:35:42+5:30
लाखनी तालुक्यातील सालेभाटा येथे अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. अतिवृष्टीग्रस्तांना घरकुलाच्या

अतिवृष्टीग्रस्त घरकुलापासून वंचित
भंडारा : लाखनी तालुक्यातील सालेभाटा येथे अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. अतिवृष्टीग्रस्तांना घरकुलाच्या लाभासह रस्त्यांचे प्रश्न, स्मशानभूमीतील समस्या मार्गी लावण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य कैलास भगत यांनी केली आहे. जनता दरबारातही प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
लाखनी तालुक्यातील सालेभाटा हे मोठ्या लोकवस्तीचे गाव आहे. येथील अतिवृष्टीग्रस्तांना घरकुलाचा लाभ मिळालेला नाही. या लाभार्थ्यांची संख्या ३० च्या जवळपास आहे. स्मशानभुमीतील प्रश्न जैसे थे आहे. लाखनी-सालेभाटा-बाम्पेवाडा, परसोडी-सोनेगाव या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम रखडले आहे. वाढीव कुटुंबाना योजनेअंतर्गत शौचालयाचे बांधकाम करुण देण्यात यावे ही मागणी बऱ्याच महिन्यांपासून प्रलंबित आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात काही जणांचे घरकुलाअभावी वास्तव आहे.
२७ फेब्रुवारीला आयोजीत जनता दरबारात विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र या समस्यांकडे खंडविकास अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. असा आरोपही यावेळी करण्यात आला. सालेभाटा येथे ११८ शौचालयाचे बांधकाम मंजूर असताना फक्त १०० लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. या सर्व समस्यांवर जिल्हाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी लक्ष देवून मुलभूत समस्या सोडव्यावात अशी मागणी सरपंच मिलिंदाताई टेंभुर्णे, लालचंद रहांगडाले, कैलास भगत, मालता भोंडे, शोभा जांभूळकर आदींनी केली आहे. (प्रतिनिधी)