लाभार्थी शेतकऱ्यांचा मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 23:02 IST2019-01-14T23:01:43+5:302019-01-14T23:02:17+5:30
मागेल त्याला शेततळे, सिंचन विहिर, बोडी खोलीकरण, मागेल त्याला बोडी, जलयुक्त शिवार, शेती यांत्रिकीकरण, गोपीनाथ मुंढे अपघात विमा योजना, फळप्रक्रिया उद्योग यासह कृषी विभागाच्या अनेक महत्वांकाक्षी योजनेच्या गोंदिया जिल्हयातील लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्हिडिओ कॉन्सफरन्सद्वारे संवाद साधला. या संवादामुळे कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेले लाभार्थी शेतकरी सुखावले असून लाभार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांशी मनमोकळा संवाद साधला.

लाभार्थी शेतकऱ्यांचा मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मागेल त्याला शेततळे, सिंचन विहिर, बोडी खोलीकरण, मागेल त्याला बोडी, जलयुक्त शिवार, शेती यांत्रिकीकरण, गोपीनाथ मुंढे अपघात विमा योजना, फळप्रक्रिया उद्योग यासह कृषी विभागाच्या अनेक महत्वांकाक्षी योजनेच्या गोंदिया जिल्हयातील लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्हिडिओ कॉन्सफरन्सद्वारे संवाद साधला. या संवादामुळे कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेले लाभार्थी शेतकरी सुखावले असून लाभार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांशी मनमोकळा संवाद साधला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या व्हिडिओ कॉन्सफरन्समध्ये भंडारा जिल्हयातील शेडनेट हाऊस, ट्रॅक्टर अवजारे, फळबाग लागवड, ठिबक सिंचन, पॅक हाऊस, नाला खोलीकरण, शेततळे, मल्चींग, जमीन आरोग्य पत्रिका इत्यादी योजनेचे १८ लाभार्थी सहभागी झाले होते. लोक संवाद कार्यक्रमाच्या दुसºया पर्वात आज कृषी विभागाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.
जालना, पालघर, नगर, परभणी, वाशिम, गोंदिया, सोलापूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, यवतमाळ व जळगाव या जिल्हयातील लाभार्थ्यांशी थेट संवाद साधला. या संवादामधून मुख्यमंत्र्यांनी लाभार्थ्यांशी हितगुज केले. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सेंद्रिय शेती मिशन सुरु केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे ध्येय असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, शेतीच्या विविध योजनांसाठी १० हजार कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. जलयुक्त शिवारमध्ये राज्यातील १६ हजार गावे जल परिपूर्ण झाली असून ३४ लाख हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे. १ लाख ३७ हजार शेततळे निर्माण केले असून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ५१ लाख खातेदारांसाठी २४ हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत.
शेतकºयांना इत्यंभूत माहिती मिळावी यासाठी महाराष्ट्र अग्रीटेक प्रकल्पाची सुरुवात मुख्यमंत्र्यांनी आज केली. राज्यातील दिड कोटी शेतकºयांना डिजीटल प्लाटफॉर्मवर आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. एमआरसॅक व इस्त्रोच्या सहाय्याने महाराष्ट्र अग्रिटेक प्रकल्प राबविण्यात येत आहे. प्रत्येक शेतकरी डिजीटली ट्रॅक करणारा देशातील पहिला प्रयोग असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी माती परिक्षण करुन मृद आरोग्य पत्रिका मिळवून घ्यावी. गट शेतीचा लाभ घ्यावा. दुधात भेसळ करणाऱ्यावर कडक कारवाई करणार, राज्यात १ लाख सौर कृषी पंप देण्यात येणार व सर्व फिडर सोलरवर आणणार, गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत कुटूंबाचा समावेश करणार, असल्याचेही मुख्यमत्र्यांनी सांगितले.