शाळेच्या पहिल्या दिवशी विविध उपक्रम
By Admin | Updated: June 25, 2014 00:15 IST2014-06-25T00:15:22+5:302014-06-25T00:15:22+5:30
जिल्ह्यात दि.२६ जूनपासून शाळा प्रारंभ होत असून नवीन शैक्षणिक सत्राला प्रारंभ होत आहे. या दिवशी जिल्ह्यातील प्रत्येक शाळा उत्साह, चैतन्य आणि आनंदानी भरून जाईल, या उद्देशाने प्रत्येक शाळेत विविण

शाळेच्या पहिल्या दिवशी विविध उपक्रम
भंडारा : जिल्ह्यात दि.२६ जूनपासून शाळा प्रारंभ होत असून नवीन शैक्षणिक सत्राला प्रारंभ होत आहे. या दिवशी जिल्ह्यातील प्रत्येक शाळा उत्साह, चैतन्य आणि आनंदानी भरून जाईल, या उद्देशाने प्रत्येक शाळेत विविण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.
सर्व शिक्षकांनी शाळा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी दि.२५ जून रोजी सकाळी ७ वाजता शाळेत यावेत. शाळेच्या ध्वनीक्षेपकावरून शाळा सुरू होत असून, आपल्या पाल्यांना शाळेत पाठवा, असे आवाहन करण्यात येणार आहे. जागोजागी गावाच्या, वार्डाच्या चौका चौकात यासंबंधीची माहिती देण्यात येणार आहे. जि.प. पं.स. सदस्य, सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक तसेच गावातील वॉर्डातील मान्यवर, शिक्षण प्रेमी, जेष्ठ नागरिक, याचे समवेत सकाळी प्रत्येक घराला भेट देणार असून, गृहभेटीमध्ये बालकांच्या आई वडिलांना उद्या शाळेला प्रारंभ होत असल्याचे सांगून, शाळेच्या पहिल्या दिवशी १०० टक्के उपस्थिती ठेवण्यासाठी, आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्याची विनंती करण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके, स्वाध्यायपुस्तिका, गणवेश व गोड जेवण ही देण्यात येणार आहे. या गृहभेटीमध्ये दोन किंवा तीन व्यक्तींचे गट करून प्रत्येक घराला भेट दिली जाईल.
गृहभेटी सकाळी ७ ते ९ या वेळेत झाल्यावर, गावातील नागरिक, युवा मंडळाच्या सहकार्याने शाळा परिसर झाडून स्वच्छ करण्यात येईल. सडा, रांगोळी काढून, आंब्याच्या पानांची आणि उपलब्ध फुलांची तोरणे बांधून शाळा सुंदर करण्यात येईल. शाळेच्या दर्शनी फलकावर नवीन शैक्षणिक वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा असे संदेश लिहून ठेवण्यात येईल. शाळेत येणाऱ्या प्रत्येक बालकांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करावे, जि.प. पं.स. सदस्य, सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक, विद्यार्थी, तसेच शिक्षण प्रेमी, जेष्ठ नागरिक, याचे समवेत प्रभातफेरी शिक्षण दिंडी काढली जाईल. शाळेच्या पहिल्या दिवशी १०० टक्के उपस्थिती राहतील, प्रभातफेरी शिक्षण दिंडी पूर्ण झाली की मान्यवरांचे उपस्थितीत, त्यांचेच हस्ते, समारंभपूर्वक मोफत पाठ्यपुस्तके स्वाध्यापुस्तिका व गणेवश वितरीत करण्यात येणार आहे, दि.२६ जून हा दिवस राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस आहे. हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून तसेच पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे, शाळेच्या पहिल्या दिवशी, शालेय पोषण आहारात गोड पदार्थासह जेवण देण्यात येईल. वर्षभर करावयाच्या कामाचा संकल्प करून दर्जेदार शिक्षणाचा निर्धार करण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी पासूनच अध्यापनास सुरूवात करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी केले आहे. (नगर प्रतिनिधी)