शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
2
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
3
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
4
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
5
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
6
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
7
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
8
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
9
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
10
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
11
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
12
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
13
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
14
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
15
दीप्ती शर्मानं रचला इतिहास! आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यातही 'नंबर वन'
16
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
17
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
18
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
19
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
20
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
Daily Top 2Weekly Top 5

बुद्धिमानचा मृत्यू थंडीने की खून? विरली खुर्द गाव हादरले; तरुणाचा संशयास्पद मृत्यू चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 14:38 IST

Bhandara : लाखांदूर तालुक्यातील विरली (बु.) आणि त्यानंतर आथली येथील खून प्रकरणानंतर आता विरली (खुर्द) येथे एका इसमाच्या संशयास्पद मृत्यूमुळे तालुक्यात विविध चर्चाना उधाण आले आहे. ८ नोव्हेंबरला गावातीलच काही लोकांनी बुद्धीमान याला मारहाण केल्याची चर्चा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर / विरली (बु.) (भंडारा) : एका ३५ वर्षीय इसमाचा संशयास्पद अवस्थेत घरासमोरच मृतदेह आढळला. ही घटना ९ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास तालुक्यातील विरली (खुर्द) येथे उघडकीला आली. बुद्धिमान धनविजय रा.विरली (खुर्द) असे मृत तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी लाखांदूर पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला असला तरी मृत्यू नेमका कशाने झाला? हा नैसर्गिक मृत्यू की हत्या ही बाब अद्यापही गुलदस्त्यात आहे. दरम्यान याप्रकरणी लाखांदूर पोलिसांनी तपासासाठी पाच जणांना ताब्यात घेतल्याचे समजते.

लाखांदूर तालुक्यातील विरली (बु.) आणि त्यानंतर आथली येथील खून प्रकरणानंतर आता विरली (खुर्द) येथे एका इसमाच्या संशयास्पद मृत्यूमुळे तालुक्यात विविध चर्चाना उधाण आले आहे. ८ नोव्हेंबरला गावातीलच काही लोकांनी बुद्धीमान याला मारहाण केल्याची चर्चा आहे. तो थंडीत रात्रभर बाहेर झोपून राहिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला कुणीकुणी मारहाण केली, त्याला मारहाण करीत गावाच्या बाहेर नेण्यात आले काय? या चर्चेवरही पोलिसांचा तपास सुरु आहे. शवविच्छेदन अहवालने बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील.

एका व्यक्तीने थेट दिली पोलिसांना माहिती

या घटनेची माहिती गावातीलच एका व्यक्तीने पोलिसांना दिली. माहिती होताच साकोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे, लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गंद्रे, पोलीस हवालदार संतोष चव्हाण, राजेंद्र कुरुडकर, प्रमोद टेकाम, जयेश जवंजारकर, सतीश सिंगनजुडे, पोलीस अंमलदार निलेश चव्हाण, विनोद मैंद, विकास रणदिवे, ओमकार सपाटे, मुरलीधर धुर्वे, किशोर टेकाम, फुलचंद मडावी, अंतेश्वर झिंकवाड यासह अन्य पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. लाखांदूर पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे. मृत पावलेल्या बुद्धीमानच्या शरीरावर मारहाणीचे व्रण असल्याने हा मृत्यू संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वृत्त लिहीपर्यंत लाखांदूर पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले होते. दरम्यान मृतकाच्या मामाने सकाळच्या सुमारास लाखांदूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Suspicious Death in Virli Khurd: Murder or Cold?

Web Summary : A 35-year-old man, Buddhiman, was found dead in Virli Khurd. Suspicion arises from reported beatings and marks on his body. Police investigate murder or death by exposure. Five detained; autopsy awaited.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू