Dhanendra Turakar: The activities of the District Primary Teachers 'Institute are inspiring, the activities of the District Primary Teachers' Institutes | धनेंद्र तुरकर : जिल्हा प्राथमिक शिक्षक संस्थचे कार्य प्रेरणादायी, जिल्हा प्राथमिक शिक्षक संस्थेचा उपक्रम
धनेंद्र तुरकर : जिल्हा प्राथमिक शिक्षक संस्थचे कार्य प्रेरणादायी, जिल्हा प्राथमिक शिक्षक संस्थेचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा प्राथमिक शिक्षक संस्थेच्या माध्यमातून सभासदांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी पुढाकार घेतल्या जाते. या संस्थतर्फे राबविण्यात येणारे उपक्रम प्रेरणादायी असून याचा मोठा अभिमान असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद शिक्षण सभापती धनेंद्र तुरकर यांनी केले.
जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने येथील संताजी मंगल कार्यालयात गुणवंत विद्यार्थी, आदर्श शिक्षक आणि सेवानिवृत्त शिक्षक यांच्या सत्काराचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परीषद माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष धनंजय बिरणवार होते. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) एल. एस. पाच्छापूरे, दिलीप बावनकर, ओमप्रकाश गायधने, रमेश सिंगनजुडे, युवराज वंजारी आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष संजीव बावनकर यांनी केले. त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना भविष्यात यापेक्षाही मोठे यश प्राप्त करावे, आदर्श शिक्षकांकडून प्रेरणा घेऊन शिक्षकांनी उत्कृष्ट विद्यार्थी घडविण्यासाठी आपले संपूर्ण योगदान देत आहेत.भंडारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था प्रगतीपथावर असुन सभासदांना १३ लाख रुपये १० टक्के व्याज दराने कर्ज देते व सभासदांच्या हितासाठी पुन्हा व्याजदर कमी करण्याचा मानस असल्याचे सांगितले.
या प्रसंगी सुधीर वाघमारे, नामदेव गभने, दिनेश घोडीचोर,संध्या गिºहेपुंजे, राधेश्याम आमकर, विनायक मोथारकर, भास्कर खेडीकर, शिक्षक संस्थेचे उपाध्यक्ष रमेश काटेखाये, शाखाध्यक्ष अनिल गयगये, भैय्यालाल देशमुख, राकेश चिचामे, संचालक शंकर नखाते, राजन सव्वालाखे, प्रकाश चाचेरे, विकास गायधने, शिलकुमार वैद्य, यामिनी गिºहेपुंजे, विजया कोरे, योगेश कुटे, जुनी पेंशन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष मडावी, राजू सिंगनजुडे, मुकेश मेश्राम, सुरेंद्र उके यांच्यासह शिक्षक संघटनेचे जिल्हा व तालुका पदाधिकारी आणि संस्थेचे सभासद व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमात १२५ गुणवंत विद्यार्थी, ९८ सेवानिवृत्त शिक्षक सभासद व ११ राज्य व जिल्हा आदर्श शिक्षकांचा सत्कार करुन गौरविण्यात आले. तसेच संस्थेचे उत्कृष्ट कार्य करणारे कर्मचारी म्हणून दिपक चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांमधून श्रेया खेमचंद निखाडे आणि प्रतीक्षा प्रमोद बेदपुरीया या विद्यार्थिनींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. संचालन संचालक प्रकाश चाचेरे यांनी तर, आभार प्रदर्शन संचालक राजन सव्वालाखे यांनी केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे प्रधान व्यवस्थापक धर्मेंद्र मेहर, व्यवस्थापक योगेश भोयर, लेखापाल नरेंद्र गजभिये, सर्व शाखा व्यवस्थापक व संस्थेचे कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Dhanendra Turakar: The activities of the District Primary Teachers 'Institute are inspiring, the activities of the District Primary Teachers' Institutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.