शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात धान रोवणी जोमात

By admin | Updated: July 21, 2014 23:41 IST

जुलैच्या पंधरवडापर्यंत दडी मारलेल्या पावसाने अखेर सुरूवात केली. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. १७ जुलैपर्यंत जिल्ह्यात धाानाच्या रोवण्या फक्त

५३ टक्के पाऊस : ४० टक्के रोवण्या आटोपल्या, शेतकऱ्यांना दिलासाभंडारा : जुलैच्या पंधरवडापर्यंत दडी मारलेल्या पावसाने अखेर सुरूवात केली. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. १७ जुलैपर्यंत जिल्ह्यात धाानाच्या रोवण्या फक्त २.०७ टक्के पार पडल्या होत्या. आता ती ४० टक्क्यांपर्यंत पोहचली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. जिल्ह्यात यावर्षी १ लाख ८१ हजार ५९१ हेक्टर क्षेत्र धान लागवडीखाली येणार आहे. यातील १७ हजार ३४६ हेक्टरपैकी १६ हजार १४१ हेक्टर क्षेत्रात धान पऱ्यांच्यामाध्यमातून म्हणजे सरासरी ९३ टक्के धान रोवणीची लागवड करण्यात आली आहे. सध्यास्थितीत सुरू असलेल्या पावसाच्या प्रमाणात आवत्याने धानाची रोवणीत मोठी वाढ झाली आहे. आवत्याने धानाची लागवड जवळपास १४० टक्क्यांवर पोहचली आहे. जिल्ह्यात १० हजार २११ हेक्टरवर आवत्याने धानाची रोवणी होणार असून, या तुलनेत जिल्ह्यात १४ हजार ३५८ हेक्टर क्षेत्रात आवत्याने धानाची रोवणी झाली आहे. यावर्षी पावसाची स्थिती समाधानकारक असल्याने रोवणी प्रक्रिया मोठ्या प्रमाणात पार पडली असून ती जवळपास ७० हजार हेक्टरपर्यंत पोहचली आहे.भंडारा तालुक्यात २२ हजार ८८८ हेक्टर क्षेत्रात धानाची रोवणी करण्यात येणार आहे. मोहाडीत २८ हजार ८३० हेक्टर, तुमसर २८ हजार ३४० हेक्टर, पवनी २९ हजार ३९३ हेक्टर, साकोली २२ हजार ०७० हेक्टर, लाखनी २० हजार ५३० आणि लाखांदूरमध्ये २९ हजार ७२० हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कृषी विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीवरून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात तीन दिवसांपासून धानाच्या रोवण्यांना जोमाने सुरूवात झाली आहे. तुमसर, मोहाडी तालुक्यात पावसाची स्थिती चांगली असल्याने तेथील शेतकरी धान रोवणी आटोपण्याच्या कामात गुंतले आहे.उत्पादनात वाढ होण्याची शक्यतासमाधानकारक पाऊस पडल्याने यावर्षी धान उत्पादन कमी होण्याऐवजी वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हा कृषी अधिक्षक हनुमंत कुदले यांच्याशी संपर्क साधला असता, पूर्वमध्ये कमी पाऊस पडल्याने धान रोवण्या उशिरा झाल्याने शेतकरी चिंतीत होते आणि धान उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र दमदार पावसाने ही चिंता आता मिटली आहे. (शहर प्रतिनिधी)