लोकप्रतिनिधींच्या वादात खुंटला जिल्ह्याचा विकास!
By Admin | Updated: July 17, 2015 00:35 IST2015-07-17T00:35:23+5:302015-07-17T00:35:23+5:30
पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा प्रमुख जिल्ह्यात भंडारा हे महत्वपूर्ण जिल्हा म्हणून प्रगत व प्रसिद्ध शहर असले, ...

लोकप्रतिनिधींच्या वादात खुंटला जिल्ह्याचा विकास!
भंडारा : पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा प्रमुख जिल्ह्यात भंडारा हे महत्वपूर्ण जिल्हा म्हणून प्रगत व प्रसिद्ध शहर असले, तरी गेल्या काही वर्षांपासून या शहराचा विकास खुंटला आहे.
संपूर्ण देशात भंडारा जिल्ह्याला एक वेगळीच ओळख आहे. पूर्वी पितळी उद्योगात भंडारा जिल्हा हा प्रसिद्ध होता. जिल्ह्यातील पवनी तालुका हा देवदर्शनासाठी तेवढाच प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात कोका अभयारण्य, राष्ट्रीय गोसेखुर्द धरण, गौतम बुद्धाचे पवित्र स्थान असलेले सिंदपुरी या सर्व गोष्टीमुळे भंडारा जिल्ह्याची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. मात्र, जिल्ह्यातील राजकीय व प्रशासकीय पातळीवरचा आलेख उतरल्यामुळे जिल्ह्यासह शहराचाही विकास खुंटला आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणारे माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या राजकीय कार्यकाळात दोन्ही जिल्ह्याच्या विकासासाठी आपल्या परीने प्रयत्न केलेत. भंडारा जिल्ह्यातून १९९९ मध्ये गोंदिया जिल्हा वगळण्यात आला. त्यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया जिल्ह्याचे विभाजनाकरिता सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नाला १०० टक्के यशही मिळाले. मात्र, त्यांनी भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या विकास कामाचे जे आश्वासन दिले होते. त्यात ते काही प्रमाणात अपयशी ठरले. गोंदिया जिल्ह्यात अनेक विकास कामे खेचून आणले. विमानतळाची निर्मिती केली. औद्योगिक विकासाची पूर्तीही गोंदियातच करण्यास त्यांनी भर दिला.
भंडारा जिल्हा हा भाईजींकरिता महत्वपूर्ण जिल्हा आहे. त्यामुळे त्यांनी मागील लोकसभा निवडणूकीपूर्वी व्हिडीओकॉन कंपनी जिल्ह्यात सुरू करून बेरोजगारांना रोजगारांची संधी देण्याचे आश्?वासन दिले होते. निवडणूक संपली. जिल्ह्यात सत्ताही स्थापन झाली. मात्र, व्हिडीओकॉन कंपनीचा फक्त गोडाऊन भिलेवाडा येथे उभे करण्यात आले. पहाता -पहाता पाच वर्ष लोटले, पुन्हा आश्वासनची खैरात सामान्य नागरिकांना वाटण्यात आली. याउलट काँग्रेस पक्षातून भाजपात गेलेले विद्यमान खा. नाना पटोले हे आमदार असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्याकडे अधिक भर दिला. मोर्चे, आंदोलन, रास्ता रोको असे अनेक शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलने केलीत. सर्व राजकीय पुढारी आपआपल्या पद्धतीने जिल्ह्याच्या विकासासाठी 'आम्ही हे करणार, ते करणार !' असे आश्वासन देत सत्ता भोगत होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत 'मोदी लाट' देशभरात निर्माण झाली होती. या लाटेत गोंदिया-भंडारा जिल्हाही अपवाद राहीला नाही. प्रफुल्ल पटेल यांनी 'भेल' कारखान्याला जिल्ह्यातील साकोली जवळ मंजुरी मिळवून दिली. भेलचे काही प्रमाणात कामही करण्यात आले. मात्र, अद्याप कुठल्याही बेरोजगारांची भेलमध्ये वर्णी लागली नाही. मोदी लाटेने यावेळच्या निवडणुकीत नाना पटोले यांना खासदारकी मिळवून दिली. विधानसभा निवडणुकीतही मोदी लाट सोबत होती. जिल्ह्यात तिनही विधानसभा क्षेत्र भाजपाने जिंकून झेंडा फडकविला. मात्र, खासदार नाना पटोले यांनी पूर्वी शेतकऱ्यांच्या हिताचे जे आश्वासन दिले होते. त्यांची पुर्तता न झाल्याने शेतकऱ्यांनी भाजपला त्यांची जागा दाखवून दिली. मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसचे आपले अस्तित्व जिल्ह्यात असल्याचे सिद्ध करून दाखविले. राष्ट्रवादी व भाजप यांच्या वादात काँग्रेसने बाजी मारली. पण, जिल्ह्याचा विकास मात्र, कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून करण्यात आला नाही. भेल कारखाना सुरू करण्याचे आश्वासन लोकप्रतिनिधीकडून मिळत असले तरी, हा कारखान कधी सुरू होणार, हे कोणीही सांगू शकत नाही. सर्व पक्षातील नेते फक्त आश्वासन देवून गप्प बसतात. पुर्तता कुणीही करीत नाही. त्यामुळे गोंदिया, नागपूर जिल्ह्यापेक्षा भंडारा जिल्हा विकासापासून कोसो दूर आहे. (नगर प्रतिनिधी)