खेळांमुळे सुप्त गुणांचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2016 00:29 IST2016-08-12T00:29:30+5:302016-08-12T00:29:30+5:30
स्मार्ट फोनवर विद्यार्थ्यांनी खेळ खेळण्यापेक्षा मैदानी खेळ खेळले असता आपल्या अंगी असलेले सुप्त...

खेळांमुळे सुप्त गुणांचा विकास
खो-खो स्पर्धा : बाबु आंबेडकर यांचे प्रतिपादन, ३१ केंद्रीय शाळांचा सहभाग
जवाहरनगर : स्मार्ट फोनवर विद्यार्थ्यांनी खेळ खेळण्यापेक्षा मैदानी खेळ खेळले असता आपल्या अंगी असलेले सुप्त गुण विकसीत होते. आपले आरोग्य सुदृढ राहते. परिणामी कोणत्याही परिस्थितीचा सामना दृढपणे करता येतो असे प्रतिपादन आयुध निर्माणी अतिरिक्त महाप्रबंधक बाबु आंबेडकर यांनी केले.
आयुध निर्माण केंद्रीय विद्यालयात १४ व १९ वर्षीय शालेय विद्यार्थ्यांचे खो-खो स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी बाबु आंबेडकर बोलत होते. यावेळी प्राचार्य महीपाल सिंग, मुख्याध्यापक जे. एस. भाटीया, विजय भगत, आ.बी.गंगाले, डॉ. चंद्रमोहन गुप्ता, भंडारा जिल्हा स्पोर्ट असोसियशनचे प्रा. प्रकाश सिंग, सतीश पॉल, अरुण बांडेबुचे, दिनेश टेकाम, बेनीलाल चौधरी, प्रकाश चुटे, राजेश गेडाम, प्रशांत कुकडे, पुरुषोत्तम सेलोकर, सुशमा नेरकर, मधुकर गायधने उपस्थित होते.
प्राचार्य महीपाल सिंग म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास असायला पाहिजे. नियमाचे पालन करा. खेळाडू वृत्तीने कौशल्य पणाला लावून आपली योग्यता सिध्द करा. याप्रसंगी स्थानिक केंद्रीय विद्यालय भंडारा-जवाहरनगर येथील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक गीत व नृत्य सादर केले. १४ व १९ वर्षाखाली ३१ केंद्रीय शाळेतील एकुण ३७६ विद्यार्थी खो-खो स्पर्धेत भाग घेतला. यात केंद्रीय विद्यालय, भंडारा, न्यु माजरी, सिधी (मध्यप्रदेश), खमारीया, अंबासरी, पन्ना, अजनी, नागपूर, मंडला, नरसिंगपूर, केंद्रीय विद्यालय सी.आर.पी.एफ नागपूर, केंद्रीय विद्यालय दमोह, केंद्रीय विद्यालय डब्ल्यू. सी. एल. चंद्रपूर, एस.ई.सी.एल., सी. डब्ल्यू. एस. जयंत कोलारी, नवरोझाबाद,सी.एम.एम. जबलपूर, के. व्ही. छिंदवाडा नं. २, व्ही. एफ. जे. जबलपूर, के. व्ही. यवतमाल, व्ही. एस. एन. नागपूर, के. व्ही. चंद्रपूर यांचा समावेश आहे. याठिकाणी १४ व १९ वर्ष वयोगटातील स्पर्धकांनी निवड करण्यात येईल. निवड झालेल्या जबलपूर मध्य विभागाची दोन्ही गटातील मुलांची चमु पुढे ११ ते १५ आॅक्टोंबर दरम्यान राष्ट्रीय खो-खो खेळण्यासाठी भुवनेश्वर येथे पाठविण्यात येणार आहे.
संचालन तेजश्री अगस्ती व शबाहत खान यांनी केले. आभार विजय भगत यांनी केले. (वार्ताहर)
वृक्षतोड करणाऱ्याविरूद्ध होणार कारवाई
भंडारा : वने ही मानवाला मिळालेली नैसर्गिक संपत्ती आहे. वनाचे प्रमुख घटक जमीन, वनस्पती, प्राणी व सुक्ष्मजीव जंतु असून ते एकमेकास पूरक असल्यामुळे सजीव सृष्टीचा समतोल राखण्याचे महत्वाचे कार्य करीत असतात. मानवी अस्तित्वाच्या व भविष्याच्या दृष्टीने वनाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्यामुळे आता अवैध वृक्षतोड करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे वनमंत्री यांनी दिले आहे. (प्रतिनिधी)