साकोली तालुक्यातील धानपीक उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 01:33 IST2018-10-24T01:32:54+5:302018-10-24T01:33:23+5:30
हंगामाच्या सुरुवातीला मोठ्या आशेने शेतात रोवणी केलेल्या धानावर एका पाण्याने अक्षरश: पाणी फेरले. संपूर्ण साकोली तालुक्यातील धानपीक उध्वस्त झाले आहेत. दोन महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने आणि अपुºया सिंचन व्यवस्थेने साकोली तालुक्यातील धानपीक उध्वस्त झाले आहेत.

साकोली तालुक्यातील धानपीक उद्ध्वस्त
संजय साठवणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : हंगामाच्या सुरुवातीला मोठ्या आशेने शेतात रोवणी केलेल्या धानावर एका पाण्याने अक्षरश: पाणी फेरले. संपूर्ण साकोली तालुक्यातील धानपीक उध्वस्त झाले आहेत. दोन महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने आणि अपुऱ्या सिंचन व्यवस्थेने साकोली तालुक्यातील धानपीक उध्वस्त झाले आहेत. आता शेतकºयांना दुष्काळ घोषित होण्याची आणि मदतीची अपेक्षा आहे.
साकोली हा प्रमुख भात उत्पादक तालुका होय. पावसाळ्याच्या सुरुवातीला मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी धानाची पेरणी केली. दमदार पावसाने पºहे उगवले. शेतकºयांची आशा उंचावली. प्रचंड मेहनत करून पºह्यांची रोवणी करण्यात आली. त्यानंतर काही दिवस पावसाने दडी मारली. मात्र आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात तालुक्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे धानपीक शेतात बहरू लागले. मात्र शेतकऱ्याचा हा आनंद काही काळच टिकला. पावसाने दडी मारली ती कायमची. दसरा गेला तरी पावसाचा पत्ता नाही. शेतातील धान पाण्याअभावी करपू लागले. सिंचनाची सुविधा असतानाही प्रशासनाच्या नियोजन शून्यतेने ओलीत करणे शक्य झाले नाही. भारनियमनाचे भूत शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसले आहे. अशा स्थितीत पीक वाचविताना शेतकरी उध्वस्त झाला. आता हलका धान काढणीला आला आहे. मात्र अपेक्षित उत्पन्न होत नसल्याचे दिसत आहे. उच्च प्रतीच्या धानावर किडींनी आक्रमण केले आहे. महागडे बियाणे फवारूनही कीड नियंत्रणात येत नाही. त्यामुळे कर्ज कसे फेडावे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे.
साकोली केंद्रावर २४८ क्विंटल धान खरेदी
साकोली येथे आधारभूत धान खरेदी केंद्राचा शुभारंभ झाला. पहिल्या दिवशी या धान खरेदी केंद्रावर २४८ क्विंटल धानाची खरेदी झाली. यावरूनच तालुक्यात दुष्काळस्थिती किती भीषण आहे याची कल्पना येते. शासनाने दुष्काळ घोषित करावा अशी मागणी आता तालुक्यातून होत आहे.