शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

बंदीनंतरही मोहफुलाची आंतरराज्यीय वाहतूक सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 05:00 IST

मोहफुलापासून मोठ्या प्रमाणात मद्याची निर्मिती केली जात असतानाही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे हे विशेष. पशुखाद्याकरिता मोहफुलाची आयात करण्याची परवानगी राज्य शासनाने दिली जाते. वर्षातून आठ महिने मोहफुलाची वाहतूक सुरू राहते.

ठळक मुद्दे१ ऑक्टोबर ते १५ फेब्रुवारीपर्यंत बंदी । मोहफुलाचा मद्य निर्मितीसाठी वापर

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : मध्यप्रदेश तथा छत्तीसगढ राज्यातून भंडारा जिल्ह्यात बंदी दरम्यान सर्रास मोहफुलाची आयात सुरू आहे. शासन नियमानुसार १ ऑक्टोंबर ते १५ फेब्रुवारी दरम्यान मोहफुल आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. बंदी असतानाही परराज्यातून मोहफुलाची जिल्ह्यात आयात होत असल्याने यात मोठे अर्थकारण दडल्याची परिसरात र्चा आहे.
मोहफुलापासून मोठ्या प्रमाणात मद्याची निर्मिती केली जात असतानाही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे हे विशेष.
पशुखाद्याकरिता मोहफुलाची आयात करण्याची परवानगी राज्य शासनाने दिली जाते. वर्षातून आठ महिने मोहफुलाची वाहतूक सुरू राहते. १६ फेब्रुवारी ते ३० सप्टेंबर दरम्यान परप्रांतातील मोहफुल वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. तर १ ऑक्टोबर ते १५ फेब्रुवारी पर्यंत मोहफुल वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. छत्तीसगढ व मध्यप्रदेश मोहफूल उत्पादन करणारी राज्ये आहेत. जिल्ह्याची सीमा दोन्ही राज्यांना लागून असल्याने मध्यप्रदेशातील बालाघाट, वाराशिवनी, तर छत्तीसगडमधील रायपूर येथून मोहफुलाची वाहतूक जिल्ह्यात केली जाते.

पशुखाद्याच्या नावाखाली मद्यनिर्मीतीसाठी आयात
केवळ पशुखाद्याकरीता मोहफुलाचा उपयोग करण्याचा नियम आहे, परंतु भंडारा व गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मोहफुलापासून मद्याची निर्मिती करण्यात येते. मद्य गाळप केंद्र येथे सर्रास सुरू असून पोलिसांचेच त्यांना अभय असल्याने यात अर्थकारण होत असल्याचा आरोप होत आहे. मोहफुल वाहतूकीवर बंदी असताना परराज्यातून वाहतूक कुणाच्या आशिर्वादाने सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.