लाखनी तालुक्यातील ६७९ परप्रांतीय मजुरांची रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 05:00 AM2020-05-12T05:00:00+5:302020-05-12T05:00:20+5:30

नागपूरवरुन श्रमिकांसाठी विशेष रेल्वेची सोय करण्यात आली आहे. तालुक्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांची आरोग्य तपासणी करुन त्यांना जीवनावश्यक साहित्य देवून नागपूर रेल्वेस्टेशन येथे एसटी बसने मोफत सोडण्यात आले. तालुक्यात लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर काही परप्रांतीय मजूर तात्काळ निघुन गेले होते.

Departure of 679 foreign laborers from Lakhni taluka | लाखनी तालुक्यातील ६७९ परप्रांतीय मजुरांची रवानगी

लाखनी तालुक्यातील ६७९ परप्रांतीय मजुरांची रवानगी

Next
ठळक मुद्देलाखनी तहसीलचा पुढाकार : श्रमिक स्पेशल रेल्वेने मजुरांची रवानगी

चंदन मोटघरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे तालुक्यात अनेक परप्रांतीय मजूर अडकून पडले होते. तिसऱ्या टप्प्यावरील लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना लाखनी तहसील कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाद्वारे थेट मजुरांच्या गावी पोहोचवले जाणार आहे. लाखनी ते नागपूर एसटी बसने मजूरांना पोहोचविले जाणार आहे.
नागपूरवरुन श्रमिकांसाठी विशेष रेल्वेची सोय करण्यात आली आहे. तालुक्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांची आरोग्य तपासणी करुन त्यांना जीवनावश्यक साहित्य देवून नागपूर रेल्वेस्टेशन येथे एसटी बसने मोफत सोडण्यात आले. तालुक्यात लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर काही परप्रांतीय मजूर तात्काळ निघुन गेले होते. मात्र त्यातील अनेक मजूर अडकून पडले होते. तालुक्यात लॉकडाऊन कालखंडात अडकलेल्या मजुरांची संख्या ६७९ आहे. यामध्ये बिहारचे १५५ मजूर, तर उत्तरप्रदेशचे ११२, मध्यप्रदेश ५९, छत्तीसगढ १२, झारखंड ६२, हरियाणा १७, पश्चिम बंगाल २६ व इतर राज्यातील २२६ मजूर लाखनी तालुक्यात अडकले होते. यामध्ये मजुरीसह छोटामोठा व्यवसाय करणारे देखील परप्रांतीय आहेत. तालुक्यात उड्डाणपूलाचे बांधकाम सुरु होते.
राज्य महामार्गाचे रुंदीकरण, खोसेखुर्द कालव्याचे काम सुरु होते. सदर कामावर परप्रांतीय मजूर मोठ्या प्रमाणात होते. यासाठी तालुक्यात अडकलेल्या मजुरांना थेट त्यांच्या गावापर्यंत पोहोचविण्याची मोहीम लाखनीचे तहसीलदार मलीक विराणी यांच्या नेतृत्वात सुरु आहे. तालुक्यात मोठ्या संख्येचे परप्रांतीय मजूर कामावर होते.
लॉकडाऊनदरम्यान अडकलेल्या मजुरांची जिल्हा परिषद गांधी विद्यालयात तालुका प्रशासनाने व्यवस्था केली आहे. या मजुरांना दररोज जेवन, चहा, नास्ता दिला जात होता. सोमवारी दुपारी ३ वाजता एसटी बसने नागपूर रेल्वेस्टेशनवर मजुरांना सोडण्यात आले.

प्रशासनाचे मानले आभार
कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव वाढत असताना लाखनी तालुका प्रशासनाच्यावतीने ६७९ मजुरांची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये मजुरांना जेवनासह इतर सुविधा पुरविण्यात आल्या. यावेळी आपल्या गावाकडे निघालेल्या मजुरांनी लाखनी तहसीलदार मलिक विराणी यांच्यासह प्रशासनाचे आभार मानले. यावेळी अनेक मजुरांना भावना अनावरण झाल्या होत्या.

Web Title: Departure of 679 foreign laborers from Lakhni taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.