सिल्ली येथे डेंग्यूची लागण
By Admin | Updated: August 16, 2014 23:18 IST2014-08-16T23:18:10+5:302014-08-16T23:18:10+5:30
मागील १५ दिवसांपासून सिल्ली येथे डेंग्यू आजाराची लागण सुरू झाली आहे. चार बालकांना या आजाराने ग्रासले आहे. १५ च्यावर संशयित रुग्ण असून याबाबत आरोग्य विभागाला माहिती देऊनही

सिल्ली येथे डेंग्यूची लागण
चार मुले बाधित : डास प्रतिबंधक फवारणी नाही
भंडारा : मागील १५ दिवसांपासून सिल्ली येथे डेंग्यू आजाराची लागण सुरू झाली आहे. चार बालकांना या आजाराने ग्रासले आहे. १५ च्यावर संशयित रुग्ण असून याबाबत आरोग्य विभागाला माहिती देऊनही गावात डास प्रतिबंधक फवारणी केली नाही.
जुलै महिन्यात दोन मुलांना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले होते. यात तुषार घनश्याम चोपकर व दिपांशू आनंद साखरवाडे या मुलांना डेंग्यूने ग्रासले होते. या महिन्यात सेजल राजेश हुमणे (५), परीक्षित किशोर वासनिक (८), पारस जितेंद्र हुमणे (१३) व सांची जितेंद्र रामटेके (१०) या मुलांना डेंग्यूची लागण झाली आहे.
यात सेजल हुमणे व परिक्षीत वासनिक यांना नागपुरला हलविण्यात आले आहे. पारस व सांची या भावंडावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. जुलै महिन्यात सिल्ली गावात डेंग्यूची लागण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्यात आली. मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे गावात भितीचे वातावरण पसरले आहे. सिल्लीत डासांचा प्रादुर्भाव असून ग्रामपंचायतने उपाययोजना केली नाही. अनेक वर्षापासून डास प्रतिबंधक धुरफवारणी केली नाही. मशीन नादुरुस्त असल्याचे ग्रामपंचायतीचे म्हणने आहे.
(शहर प्रतिनिधी)