मुरमाडी येथे घरकुल मंजूर करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:47 IST2021-02-27T04:47:51+5:302021-02-27T04:47:51+5:30
लाखनीः तालुक्यातील मुरमाडी (सावरी) जिल्हा क्षेत्रातील मुरमाडी ग्रामपंचायत मधील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २८४ लाभार्थी अद्यापही घरकुलच्या ...

मुरमाडी येथे घरकुल मंजूर करण्याची मागणी
लाखनीः तालुक्यातील मुरमाडी (सावरी) जिल्हा क्षेत्रातील मुरमाडी ग्रामपंचायत मधील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २८४ लाभार्थी अद्यापही घरकुलच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच परिसरात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिन निलेश गाढवे यांनी खंडविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव यांच्याकडे केली आहे.
मुरमाडी (सावरी) मध्ये ग्राम विकास अधिकारी विकास कामाकडे दुर्लक्ष करीत आहेत. घरकुल साठी प्रतिक्षेत असणारे २८४ लाभार्थ्यांना घरकुल मिळाले नाही. त्यामुळे त्यांना राहायला घर नाही. सध्या कामे तात्काळ सुरू करणे व वंचितांना घरकुल देण्याची मागणी निवेदनातून केली आहे.
निवेदन रा.कॉं. जिल्हा सचिव निलेश गाढवे यांच्या नेतृत्वात राहुल तवाडे , शशिकांत भोयर, राजू शिवरकर , प्रमोद महाजन, विनोद बावनकुळे, रुपेश देशमुख, अखिल बागडे ,रवी बावनकुळे, प्रदीप मडावी, डिलेश्वरी डोरले, साधना बावनकुळे, रंजीत पाखमोडे , भारतकला मेश्राम, पुस्तकला बावनकुळे, वच्छला बागडे, मंगला बावनकुळे आदि राकाॅ पदाधिकारी उपस्थित होते.