स्वतंत्र बौद्ध कायद्याची मागणी

By Admin | Updated: October 30, 2015 00:47 IST2015-10-30T00:47:38+5:302015-10-30T00:47:38+5:30

दि रजिस्टर्ड बद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडियाच्या वतीने इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटर बुध्दगया येथे उच्च वर्ग बौध्द समाजाचे तीन दिवसीय अधिवेशन थाटामाटात पार पडले.

The demand for independent Buddhist laws | स्वतंत्र बौद्ध कायद्याची मागणी

स्वतंत्र बौद्ध कायद्याची मागणी

बौध्द समाजाचे अधिवेशन : जिल्ह्यातील अनुयायांचा समावेश
भंडारा : दि रजिस्टर्ड बद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडियाच्या वतीने इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटर बुध्दगया येथे उच्च वर्ग बौध्द समाजाचे तीन दिवसीय अधिवेशन थाटामाटात पार पडले. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी आर. एच. बौध्द उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. सुधीर बौध्द, ईएमपी बोरकर, डॉ. एस. के. बोरकर यांच्यासह देशविदेशातील भंते उपस्थित होते.
यावेळी अतिथींनी बुध्द धर्म हा भारतातील आहे. बुध्द धर्माचे कायदे आजपर्यंत झालेले नाही. ही खेदाची बाब आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे आयोजक सुधीर बौध्द म्हणाले, अडीच व हजार वर्षांपासून चालत आलेल्या बौध्द धर्माचा आजपर्यंत पृथक बुध्द समाज अजूनपर्यंत तयार झालेला नाही. संपूर्ण भारतात बुध्द धर्माला आध्यात्मिक मानतात. सामाजिक नाही. भारतामधून बुध्द धर्म लोप पावला. बुध्द धर्मा सामाजिक व्हायला पाहिजे म्हणून बुध्दीस्ट डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी १९५६ ला विधीवत सामुदायीक धर्मांतरित दिक्षा घेतली. बौध्द धर्माचा वेगळा समाज बनेल आणि भारतामध्ये समता मुलक नैतिक, उच्च आदर्श बौध्द समाजाची स्थापना होऊ शकेल. आर.एच. बौध्द म्हणाले, आज उच्च वर्गीय बौध्द समाज तयार झालेला आहे. बाबासाहेबांचे भारत बुध्दमय करण्याचे स्वप्न पुर्ण होतील. बुध्दांचा जातीविहिन, वर्गविहीन, पृथक समाज तयार होईल. असे प्रतिपादन केले. यावेळी विवेक बौध्द, चेतन बौध्द, इंदल बौध्द, जीवन बौध्द, लीमिचंद बौध्द, पटीसेन बौध्द, विजय बौध्द, हिमांशू बौध्द, प्रतिमा बौध्द, ज्योती बौध्द, प्रतीक बौध्द, भगवान बौध्द, पुष्पलता बौध्द, अशोक बौध्द, मित्रसेन बौध्द, संतोष बौध्द, प्रदीप बौध्द, गंभीर बौध्द, भारत बौध्द, प्रनीत बौध्द आणि बौध्द मंडळी उपस्थित होती. तसेच चीन जपान, कोरिया, श्रीलंका, तिब्बत, लद्दाक, ब्रम्हदेश आदी देशातून भंते उपस्थित होते.
(नगर प्रतिनिधी)

Web Title: The demand for independent Buddhist laws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.