अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 06:00 IST2019-09-16T06:00:00+5:302019-09-16T06:00:50+5:30
शेतकऱ्यांनी बिजाई लावली. त्यावेळी शेतकऱ्यांना खत आणि औषधांसाठीे १२३५ रुपये मिळणार होते. पूर्ण वर्ष संपत आला. परंतु अजूनपर्यंत ती रक्कम मिळाली नाही. ती रक्कम तातडीने देण्यात यावी, केंद्र शासनाने शेतकरी सन्मान योजना घोषीत केली. त्यात वर्षाचे सहा हजार रुपये देण्यात येणार आहे असे सांगितले. परंतु आजपावेतो एकही रक्कम खात्यावर जमा झालेली नाही.

अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा तालुक्यातील वैनगंगा व सुर नदीच्या खोऱ्यात वसलेल्या खमाटा टाकळी गावातील शेतकऱ्यांना शासकीय लाभापासून दूर ठेवण्यात आले. अशा वंचित व अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम तात्काळ मिळण्यात यावी, अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीने निवासी जिल्हाधिकारी विलास ठाकरे यांच्यामार्फत मुख्यमंत्री पालकमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनानुसार, नोव्हेंबर व डिसेंबर २०१८ ला कृषी विभाग भंडारा मार्फत ग्रामपंचायत काार्यलय खमाटा येथे हरभरा ही बिजाई देण्यात आली. शेतकऱ्यांनी बिजाई लावली. त्यावेळी शेतकऱ्यांना खत आणि औषधांसाठीे १२३५ रुपये मिळणार होते. पूर्ण वर्ष संपत आला. परंतु अजूनपर्यंत ती रक्कम मिळाली नाही. ती रक्कम तातडीने देण्यात यावी, केंद्र शासनाने शेतकरी सन्मान योजना घोषीत केली. त्यात वर्षाचे सहा हजार रुपये देण्यात येणार आहे असे सांगितले. परंतु आजपावेतो एकही रक्कम खात्यावर जमा झालेली नाही. शासन प्रशासनाने शेतकरी सन्मान योजनांचे सहा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात तातडीने जमा करावी, सप्टेंबरच्या ९ व १० तारखेला वैनगंगा नदीला महापूर आला. या महापुरात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या महापुरात शेतकºयांचे धानाचे पीक, लालभाजी, पालकभाजी, भेंडी ही पिके बुडाली असून वांग्याचे रोप, मिरचीचे रोप, टमाटरचे रोप नष्ट झाले आहेत. त्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याची तात्काळ चौकशी करावी व नुकसानभरपाई देण्यात यावी असे निवेदन अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आले आहे. शिष्टमंडळात अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, कार्याध्यक्ष विष्णूदास लोणारे, सचिव पुरुषोत्तम गायधने, माजी सरपंच व शेतकरी कोठीराम पवनकर, राजकुमार भोपे, विश्वजीत क्षीरसागर, अरुण भेदे, विनोद भोपे, मोरेश्वर सेलोकर, प्रकाश भोपे, रुपचंद पवनकर या शेतकऱ्यांनी प्रकाश भोपे, मोरेश्वर सेलोकर, बंडू राघोर्ते, विनोद राघोर्ते, सुनील भेदे, केशो आस्वले, योगेश गायधने, राजेश चौधरी, जयंता आस्वले उपस्थित होते.