शेतमालाच्या भावात घट
By Admin | Updated: June 21, 2014 01:00 IST2014-06-21T01:00:12+5:302014-06-21T01:00:12+5:30
केंद्रात नवीन सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचे अच्छे दिन येणार असे वातावरण तयार केले.

शेतमालाच्या भावात घट
कोंढा (कोसरा) : केंद्रात नवीन सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचे अच्छे दिन येणार असे वातावरण तयार केले. पण उन्हाळी धानाच्या भावात तसेच अनेक पिकाच्या भावात लक्षणीय घट झाली. बासमतीसारखे सुगंधी धान १३०० रूपये प्रति क्विंटल विकावे लागते. त्यामुळे व्यापारी मध्यस्थांसाठी चांगले दिवस आले, असे शेतकरी बोलत आहेत.
परिसरात जून महिन्यात शेतकरी उन्हाळी धान पिकाची विक्री तसेच खरीप हंगामासाठी बी बियाणे खरेदी व शेतीचा हंगाम करण्यात व्यस्त असते. पेरणी करण्यासाठी वापरत असलेल्या बि-बियाणाचे भाव गगनाला भिडले आहे. नवीन सरकार केंद्रात आल्यानंतर बि-बियाणे यांचे भाव कमी होईल ती अपेक्षा पूर्ण झाली नाही. धानाला योग्य भत्तव मिळेल असे वाटत होते. पण शेतमालाच्या भावात लक्षणीय घट झाली आहे. बासमती धानाला खरेदी करणारे व्यापारी मातीमोल म्हणजे १३०० रूपये भाव देत आहेत. जून महिन्याच्या शेवटी घरोघरी मुलांचे गणवेश, शाळा प्रवेश वह्या पुस्तके याची खरेदीवर भर असते.अशावेळी किंमती वाढलेल्या दिसतील तेव्हा अच्छे दिन येणार ही एक कल्पनाच राहणार आहे. केंद्र सरकारने महागाई कमी करण्यासाठी आश्वासन दिले पण त्यासाठी कोणते पाऊले उचलणार हे जाहीर केले नाही. भाजीपाला, कांदे यांचे भाव वाढतच आहे तेव्हा सामान्य नागरिकांना याचा सामना करावा लागतो. शेतकऱ्याच्या भावाला मात्र बाजारपेठेत घट झाल्याची दिसते आहे. मुंगाच्या भावात क्विंटलला दोन हजार उळीद क्विंटलला ७०० रूपये गव्हाच्या क्विंटलला ४५० रूपये घट झाली आहे,असे सर्वच शेतमालाच्या भावात घट झाल्याने शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. (वार्ताहर)