शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

शाळांबाबत निर्णय शासनानेच द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 5:00 AM

शाळांवर जबाबदारी सोपवू नये, अशा आशयाचे निवेदन मोहाडी तालुका मुख्याध्यापक संघाने गटशिक्षणाधिकऱ्यांच्यामार्फत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना पाठविण्यात आले आहे.

ठळक मुद्देनिधीची मागणी : मोहाडी तालुका मुख्याध्यापक संघाचे निवेदन, शाळेत साधन उपलब्ध करून देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : प्रशासनाच्या माध्यमातून शासनाला प्रत्येक बाबींची माहिती दिल्या जाते. खडा न खडा राज्याची परिस्थितीची जाणीव शासनाला असते. मग शाळा सुरू करण्याचा स्पष्ट निर्णय शासनानेच द्यावा. शाळांवर जबाबदारी सोपवू नये, अशा आशयाचे निवेदन मोहाडी तालुका मुख्याध्यापक संघाने गटशिक्षणाधिकऱ्यांच्यामार्फत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना पाठविण्यात आले आहे.सध्या कोरोनाची भीती अजूनही कायम आहे. तरीही शाळा सुरू करण्याचे धाडस चालले आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय शाळेच्या मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीवर सोपविला गेला आहे. प्रशासनातील काही अधिकारी तर शाळा सुरू करण्यास सकारात्मक माहिती द्या, असा अप्रत्यक्ष दबाव निर्माण करित आहेत. कोरोनाचा प्रभाव वाढत आहे तसेच पावसाळा सुरू झालेला आहे. ताप, सर्दी, खोकला याचे रुग्ण वाढत आहेत. तरीही शासनाने शाळा सुरू करा असा स्पष्ट निर्णय दिला पाहिजे. तसेच शाळा सुरू करताना मुख्याध्यापकांसमोर अनेक अडचणी आहेत. शाळा महिन्यातून सॅनीटायझर करणे, मुलांसाठी मास्क खरेदी करणे, साबून व स्वच्छतेची ईतर साहित्य खरेदी करणे आहे, यासाठी पैसा कुठून आणणार असा प्रश्न विचारला गेला आहे. या वर्षी शाळेला वेतनेत्तर अनुदान देण्यात आले नाही. तसेच प्रशासनाने जबाबदार घटकांना स्वतंत्र पत्र पाठविले नाही. त्यामुळे शाळांनी पत्र स्थानिक प्रशासन, आरोग्य विभाग यांना दिले तेव्हा संबंधीत प्रशासनाचे पत्रच आले नाही असे सांगितले जाते.मानव विकास व अहिल्याबाई होळकर या योजनेतून एसटी बसने प्रवास बंद आहे.शासनाने आधी शाळेत येण्यासाठी सर्व मुलांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी मुख्याध्यापक संघाची आहे. शाळा सुरू संबंधी सर्वांना समजेल, आकलन होईल असे शासन निर्णय काढण्यात यावेत.कोरोनाच्या वाढत्या संख्येने सगळेच भयभीत झाले आहेत. त्यामुळे आधी भय अन सर्व जबाबदारीची तलवार यामुळे मुख्याध्यापकांची मानसिक अवस्था समजून घेतली पाहिजे. शासनाने शाळा सुरू करण्याची जबाबदारी स्वत:वर घ्यावी. तसेच शाळांना कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी विशेष अनुदान देण्यात यावा. तसेच मुलांना शाळेत येण्यासाठी साधन उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी निवेदनात मोहाडी तालुका मुख्याध्यापक संघाने शासन, प्रशासनाकडे केली आहे.यावेळी तालुका संघाचे अध्यक्ष गोपाल बुरडे, सचिव राजू बांते, राजू भोयर, सुनीता तोडकर, यशोदा येळणे, सिंधू गहाणे, उमराज हटवार, सहसराम गाडेकर, कमल कटारे, विनोद नवदेवे, ओमप्रकाश चोले, अतुल बारई, दिगंबर राठोड, करचंददास साखरे, पंजाब कारेमोरे, गणराज बिसणे, दिनेश सेलूकर आदी उपस्थित होते.पावसाळ्यानंतर शाळा सुरु करण्यात याव्यात. विद्यार्थ्यांची एकच सत्र परीक्षा घेण्यात यावी. आपत्तीच्या वेळात सर्व शाळांना विशेष निधी शासनाने द्यावा.- गोपाल बुरडे,अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ,मोहाडी

टॅग्स :Schoolशाळा