शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसमोर कर्ज फेडण्याचे संकट

By admin | Updated: February 10, 2016 00:40 IST

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची हाक : दीड दशकांपासूनचे कर्ज थकीतमाणिक खर्डेकर सासरामहाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. शासनाचे शेतकऱ्याविषयीचे चुकीचे धोरण, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, पूरपरिस्थिती, पिकावरील रोगराई इत्यादी कारणाने नापिकी येत असल्याने त्यांचा कर्जबाजारीपणा वाढला. सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतले त्यांची परतफेड करणे कठीण झाले. त्यांचे कर्ज थकीत झाले. परिणामी त्यांचे कर्ज घेण्याचे, उत्पन्न घेण्याचे सर्व दरवाजे बंद झाले. दिवसेंदिवस कर्जाचा बोझा वाढल्याने त्यांच्या आत्महत्यांच्या प्रामणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.मागील वर्षी शासनाने शेतकऱ्याची सावकारी पाशातून मुक्तता करण्यासाठी त्यांच्या गहाण असलेल्या सोन्यासंबंधी जे पाऊल उचलले त्याने शेतकऱ्यांचे हित न साधता सावकाराचे घरे भरली. मागणी न करताच त्यांच्या सोन्यावरील कर्ज व व्याज वसुल झाले. सोन्यावर सावकारांकडून कर्ज घेणाऱ्यांची संख्या केवळ १० टक्के होती. उर्वरित ९० टक्के शेतकऱ्यांजवळ सोने नसल्याने ते सावकारी कर्ज न घेता, बँकांकडून पिक कर्ज घेतात. भंडारा जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी १० ते १५ वर्षापासून थकीत कर्जदार आहेत.सततची नापिकी, नैसर्गिक आपत्ती अशा विविध समस्यांमुळे त्यांनी कर्जची परतफेड केली नाही. ते थकीत कर्जदार झाल्याने त्यांना बँकाकडून नवीन कर्ज मिळत नाही व पिकविमा लागू होत नाही. परिणामी अठरा विश्व दारिद्र्य त्यांचा साथ सोडत नाही. त्यांच्या कौटुंबिक समस्या सतत त्यांना डिवचत असल्याने त्यांचा मनोबल खचत असल्याचे दिसत आहे. शासनाला दुष्काळात जो पॅकेज येतो तो पॅकेज देऊनही किंवा कर्जवसुली स्थगित करूनही थकीत कर्जदाराला याचा काहीही फायदा होत नाही. उलट त्यांचेवर कर्जाचा बोझा वाढत असल्याने ते हतबल होतात. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील अशा काही थकीत कर्जदार शेतकऱ्यांनी थकीत कर्जमाफी संबंधात जिल्हा उपनिबंधक, सहाय्यक उपनिबंधक, तहसीलदार, जिल्हाधिकारी तसेच आमदार व खासदार यांचेकडे कर्ज निवेदन दिले. त्याचबरोबर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही निवेदन दिले. कर्जमाफी करणे ही बाब धोरणात्मक स्वरुपाची असून सदर बाब शासनस्तरावरील आहे. अशा अधिकारी व लोकप्रतिनिधींनी यांचेकडून प्रतिक्रिया उमटल्याने आमचा वाली कोण? यासाठी शेतकरी हवालदिल झाला आहे.शासन स्मार्ट सिटी योजनेसाठी अब्जावधी खर्च करण्याचा विचार करतो. स्मार्ट सिटीमुळे शेतकऱ्यांना काहीही फायदा होणार नाही. शेतीचे उत्पन्न काढण्यासाठी खेड्यापाड्यातील जगाच्या पोशिंद्याला स्मार्ट करण्याच्या विचारांची गरज आहे. लोकप्रतिनिधींनी १० ते १५ वर्षापासून थकीत असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा गांभीर्याने विचार करणे महत्वाचे आहे. जर असे झाले नाही तर आत्महत्या वाढत वाहतील. हे शक्यता नाकारता येत नाही.