शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

लसीकरणाने मृत्यू, निपुत्रिक होण्याची अफवाच; जनजागृतीसाठी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 05:00 IST

लसीकरणाच्या सुरुवातीच्या सत्रात ग्रामीण भागात लसीकरणासाठी प्रशासनाला जिवाचा आटापिटा करावा लागला. ग्रामीण भागात लसीकरणाने मृत्यू होतो, निपुत्रिकपणा होतो, अशी अफवाच पसरविण्यात आली.  त्याचा परिणाम लसीकरणावरही पडला. मात्र प्रशासनाने  आव्हान पेलले. निरंतर जनजागृतीमुळे ग्रामीण भागात ह्या सर्व बाबी अफवा आहेत हे पटवून देण्यात यश मिळविले असून शासनाने कठोर पावले उचलली आहेत.

ठळक मुद्देग्रामीण भागात घडला सर्वाधिक प्रकार : सज्ञान होण्याची बाब अधिक गरजेची

इंद्रपाल कटकवारलोकमत न्युज नेटवर्कभंडारा : कोरोना महामारीवर लसीकरण हे एकमेव रामबाण उपाय आहे. मात्र, लसीकरणाने मृत्यू किंवा निपुत्रिक होण्याची अफवा ग्रामीण भागात सर्वाधिक ऐकावयास मिळाली ही निव्वळ अफवा असून नागरिकांनी यावर कुठलाही विश्वास ठेवू नये, अशी सकारात्मक जनजागृती शासन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. परंतू ही जनजागृती करण्यासाठी अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत  करावी लागत आहे. कोरोना महामारीने सर्वांनाच त्रस्त करून सोडले. त्यातच मास्क सोशल डिस्टंसिंग व स्वच्छता या त्रिसूत्रीचा वापर व जनजागृती नेहमीच करण्यात आली. आता लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली.  लसीकरणाच्या सुरुवातीच्या सत्रात ग्रामीण भागात लसीकरणासाठी प्रशासनाला जिवाचा आटापिटा करावा लागला. ग्रामीण भागात लसीकरणाने मृत्यू होतो, निपुत्रिकपणा होतो, अशी अफवाच पसरविण्यात आली.  त्याचा परिणाम लसीकरणावरही पडला. मात्र प्रशासनाने  आव्हान पेलले. निरंतर जनजागृतीमुळे ग्रामीण भागात ह्या सर्व बाबी अफवा आहेत हे पटवून देण्यात यश मिळविले असून शासनाने कठोर पावले उचलली आहेत.

काय आहेत अफवा

लसीकरणानंतर मृत्यू होतो ग्रामीण भागात कुठे कुठे लसीकरणामुळे मृत्यू झाल्याची अफवा पसरविण्यात आली. त्यामुळे अनेक नागरिक भीतीपोटी लसीकरणासाठी केंद्रांवर गेलेच नाही. हळूहळू जनजागृतीनंतर तरूणांनीच पुढकार घेतला. अफवांवर पटकन विश्वास ठेवणारे लाेकांना ही चूक लक्षात येतय ही महत्वाची बाब ठरली.

निपुत्रिक होण्याची शक्यतालसीकरणानंतर निपुत्रिक होण्याची दाट शक्यता असते याची अफवाच ग्रामीण भागात पसरविण्यात आली. त्यामुळे अनेक स्त्रियाही लसीकरणासाठी गेल्या नाहीत. अशी बाब नंतर उघडकीला आली. मात्र हळूहळू प्रशासनाने ही सर्व अफवा असल्याचे स्पष्ट केले. लसीकरणाला वैद्यकीय आधार आहे, हे महत्वाचे आहे.

लसीकरणानंतर घरघर वाटतेकुठलीही लस घेतली तरी मानवी शरीराचे तापमान वाढत असते. ही एक सहज व सोपी प्रक्रीया आहे. असाच प्रकार कोरोना लसीकरणानंतरही झाला. लसीकरणानंतर घरघर वाटणे, ताप येतो ही साधारण बाब तिखट मिर्च लावून   अफवेच्या रुपात सांगण्यात आली. त्यामुळे अनेकांनी लसीकरणाला नकार दिला.

गावकरी संभ्रमात

 सुरुवातीला कोरोना लसीकरण करून घ्यायचे ठरवले होते. मात्र अफवांमुळे आम्हाला भीती वाटली. आम्ही संभ्रमात सापडलो होतो. परंतू लसीकरणानंतर कुठलीही गंभीर बाब उजेडात आली नाही तसेच शरीरावरही कुठलाही विपरीत परिणाम होत नाही. - एक ग्रामस्थ, अड्याळ

कुठलीही मोहीम येण्यापूर्वी त्याची अफवा पहिले असते त्यामुळे लोकांच्या लवकर विश्वास बसतो. तसेच कोरोना लसीकरणबाबतही झाले आहे. आम्हाला पूर्वी भीती वाटायची, मात्र आता ही भीती दूर झाली आहे. - एक ग्रामस्थ, पालगाव

 अधिकारी म्हणतात,

 जिल्ह्यात लसीकरण मोहीम राज्य शासनाच्या दिशा निर्देशानुसार सुरू आहे. सुरूवातीच्या काळात ग्रामीण क्षेत्रात काही ना काही अफवा ऐकायला मिळाल्यात. त्याबाबत आम्ही सातत्याने जनजागृतीवर भर दिला. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, वेळेतच प्रत्येक नागरिकाने आपापल्या परीने लसीकरण करून घ्यावे.- डॉ. प्रशांत उईके, जिल्हा आरोग्य अधिकारी, भंडारा

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या