शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

दोघांचा मृत्यू, 285 पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 23:30 IST

गत दहा दिवसांपासून दररोज कोरोना रुग्णांची संख्या चढत्या क्रमाने वाढत आहे. शुक्रवारी २२०३ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात ११८, मोहाडी १७, तुमसर ४७, पवनी ४२, लाखनी ३८, साकोली २० आणि लाखांदूर तालुक्यात तीन असे २८५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. भंडारा तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ६९२० झाली असून, मोहाडी १२०७, तुमसर २०७३, पवनी १६८७, लाखनी १७१८, साकोली १८५७, लाखांदूर ६८८ झाली आहे.

ठळक मुद्दे८३ कोरोनामुक्त : कोरोनाबाधितांची संख्या १६ हजार १५०

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात दररोज पॉझिटिव्ह कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, शुक्रवारी नव्याने २८५ रुग्णांची भर पडली. अलीकडच्या काळातील हा आकडा सर्वाधिक आहे, तर भंडारा आणि पवनी तालुक्यातील दोन वृद्धांचा कोरोनाने मृत्यू झाला. आता कोरोनाबळींची संख्या ३३४ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १६ हजार १५० व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले असून, त्यापैकी १४ हजार १५२ व्यक्ती कोरोनामुक्त झालेत, तर १६६४ व्यक्ती उपचाराखाली आहेत. गत दहा दिवसांपासून दररोज कोरोना रुग्णांची संख्या चढत्या क्रमाने वाढत आहे. शुक्रवारी २२०३ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात ११८, मोहाडी १७, तुमसर ४७, पवनी ४२, लाखनी ३८, साकोली २० आणि लाखांदूर तालुक्यात तीन असे २८५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. भंडारा तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ६९२० झाली असून, मोहाडी १२०७, तुमसर २०७३, पवनी १६८७, लाखनी १७१८, साकोली १८५७, लाखांदूर ६८८ झाली आहे. आतापर्यंत एक लाख ६९ हजार ६७२ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात १६ हजार १५० कोरोनाबाधित आढळून आले असून, त्यापैकी १४ हजार १५२ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. कोरोना मृत्यूदर अत्यल्प आहे. मात्र गत आठ दिवसांत कोरोना मृत्यूचे प्रमाणही वाढत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी भंडारा तालुक्यातील ६० वर्षीय पुरुषाचा रुग्णालयात नेताना वाटेतच मृत्यू झाला, तर पवनी तालुक्यातील ६५ वर्षीय पुरुषाचा कोरोनाने घरीच मृत्यू झाला. एकीकडे रुग्ण संख्या वाढत असताना नागरिक मात्र कोरोना नियमांचे पालन करताना दिसत नाही.

ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १६६४

भंडारा जिल्ह्यात शुक्रवारी ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १६६४वर जाऊन पोहोचली. त्यात सर्वाधिक भंडारा तालुक्यातील ७५१, मोहाडी ९६, तुमसर २०९, पवनी ३३४, लाखनी १५७, साकोली १०६, लाखांदूर २१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील काही रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर काही होम क्वारंटाइन आहेत. जिल्हा प्रशासनाने कोरोना चाचणी वाढविली असून, ठिकठिकाणी शिबिर घेतले जात आहे. नागरिकांनी ताप, सर्दी, घोकला, अंगदुखी, घशात खवखव अशी लक्षणे आढळल्यास तत्काळ शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधून कोविड चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या