शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 05:00 IST

साकोली व लाखांदूर तालुक्याचे विभाजन करून लाखनी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. लाखनीचे भौगोलिक क्षेत्र २८ हजार ५५५ हेक्टर असून, पेरणीयोग्य क्षेत्र २४ हजार ९६० आहे. त्यापैकी २२ हजार ६३१ हेक्टर क्षेत्रात खरीप पिके तर ६ हजार ७४० हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांची लागवड केली जाते. त्यात अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य, मसाला पिकांची लागवड केली जाते.

लाेकमत न्यूज नेटवर्कलाखनी : तालुक्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे लाख, लाखोरी, हरभरा व भाजीपालाजन्य पिकांवर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होणार असल्यामुळे नुकसानीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. साकोली व लाखांदूर तालुक्याचे विभाजन करून लाखनी तालुक्याची निर्मिती करण्यात आली.लाखनीचे भौगोलिक क्षेत्र २८ हजार ५५५ हेक्टर असून, पेरणीयोग्य क्षेत्र २४ हजार ९६० आहे. त्यापैकी २२ हजार ६३१ हेक्टर क्षेत्रात खरीप पिके तर ६ हजार ७४० हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांची लागवड केली जाते. त्यात अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य, मसाला पिकांची लागवड केली जाते. अन्नधान्य पिकात गहू १ हजार १४ हेक्टर, मका ७४ हेक्टर, कडधान्यात हरभरा १ हजार २६२ हेक्टर, लाख, लाखोरी १ हजार ३३० हेक्टर, उडीद ५४८ हेक्टर, मूग ५२० हेक्टर, वटाणा १८१ हेक्टर, पोपट १९० हेक्टर, मसूर ४६ हेक्टर, गळीत धान्यात करडई २५ हेक्टर, भुईमूग ३. ५ हेक्टर, मसाला पिकात धने ९७ हेक्टर, मिरची ४७ हेक्टर, कांदा ६. ५ हेक्टर, भाजीपालाजन्य पिके ६४६ हेक्टर, पपई दोन हेक्टर, सोनबोरू २०१ हेक्टर, चारपिके १८७ हेक्टर असे एकूण ६ हजार ७४० हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून तालुक्यात सतत ढगाळ वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे लाख, लाखोरी, हरभरा व भाजीपालाजन्य पिकांवर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होऊन नुकसानीची शक्यता शेतकरी वर्गातून वर्तविण्यात येत आहे.

ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील कडधान्य पिके, मसाला पिके व भाजीपालाजन्य पिकांवर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्याने कीटकनाशक फवारणी करावी.-एम. के. जांभूळकर, कृषी अधिकारी पंचायत समिती, लाखनी

 

टॅग्स :agricultureशेती