अज्ञात वाहनांच्या धडकेत सायकलस्वार ठार; तुमसर तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 22:46 IST2020-12-08T22:46:18+5:302020-12-08T22:46:28+5:30
संजय मुरलीधर चंद्रिकापूरे (४३) रा. तामसवाडी असे मृताचे नाव आहे.

अज्ञात वाहनांच्या धडकेत सायकलस्वार ठार; तुमसर तालुक्यातील घटना
भंडारा: आठवडी बाजारातून भाजीपाला घेऊन सायकलने गावी जाताना राष्ट्रीय महामार्गावर खापा ते मांगली दरम्यान अज्ञात वाहनांच्या धडकेत सायकलस्वार जागीच ठार झाला. ही घटना मंगळवारी रात्री ८ वाजता दरम्यान घडली.
संजय मुरलीधर चंद्रिकापूरे (४३) रा. तामसवाडी असे मृताचे नाव आहे. तो तुमसर येथे मंगळवारी आठवडी बाजारासाठी आला होता. बाजारातून खरेदी करून रात्री घरी परत जात होता. त्यावेळी खापा -मांगली मार्गावर अज्ञात वाहनाने त्याच्या सायकलला धडक दिली. त्यात तो जागीच ठार झाला. घटनेची माहिती होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संजय हा अविवाहित असून त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ, बहीण, असा परिवार आहे.