सायबर हल्ल्याच्या धोक्याबाबत दिला होता इशारा

By admin | Published: May 18, 2017 12:34 AM2017-05-18T00:34:46+5:302017-05-18T00:34:46+5:30

सध्या जगभरात गाजत असलेल्या रॅन्समवेअर या हल्ल्याबाबत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाचे खासदार नाना पटोले यांनी वर्षभरापूर्वीच संसदेत प्रश्न उपस्थित केला होता.

Cyber ​​attack alerted about the attack | सायबर हल्ल्याच्या धोक्याबाबत दिला होता इशारा

सायबर हल्ल्याच्या धोक्याबाबत दिला होता इशारा

Next

नाना पटोलेंनी विचारला प्रश्न : उच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरल्याची हमी
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सध्या जगभरात गाजत असलेल्या रॅन्समवेअर या हल्ल्याबाबत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाचे खासदार नाना पटोले यांनी वर्षभरापूर्वीच संसदेत प्रश्न उपस्थित केला होता.
लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत दिनांक ११ मे २०१६ रोजी पटोलेयांनी सायबर हल्ल्याबाबत मुद्दा उपस्थित केला. यात त्यांनी म्हटले होते. प्रसार माध्यमांद्वारे पुढे आलेल्या माहितीनुसार आरआरसीटीसी या भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरील ‘डेटा हॅक’ करण्यात आला. यामध्ये जवळ पास १ कोटी ग्राहकांना ‘डेटा हॅक’ करण्याची भीती त्यांनी वर्तविली होती. या संकेतस्थळावर कोट्यवधी रुपयांची देवाण घेवाण करण्यात येते. आॅनलाईन रेल्वे तिकीट काढण्यासाठी आधारकार्ड, क्रेटीड कार्ड, डेबीट कार्ड आणि नेटबँकींगची माहिती ग्राहकांकडून पुरविण्यात येते. वेबसाईट ‘हॅक’ झाल्यास ग्राहकांची महत्वपूर्ण माहिती चोरल्या जाऊ शकते याचा विविध महत्वपूर्ण सेवांवर परिणाम होवू शकतो असा प्रश्न उपस्थित पटोले यांनी उपस्थित केला होता.
पटोले यांनी १८ नोव्हेंबर २०१६ रोजी लोकसभेत अतारांकीत प्रश्नाद्वारे भारतीय ब ँकींग क्षेत्रावरील सायबर हल्ल्याशी निगडीत प्रश्न उपस्थित केला होता. यात त्यांनी म्हटले होते. भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्याही मोठ्या सायबर हल्ल्याशी सामना करण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने कोणत्या उपाययोजना आहेत असा प्रश्न विचारला होता. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी, देशात कोणत्याही मोठ्या सायबर हल्ल्याचा सामना करण्यासाठी सायबर संकट व्यवस्थापन दलाची स्थापना करण्यात आली आहे. बँकींग परिवेक्षणासाठी सीईआरटीआयएन च्या मदतीने शासन बँकेमधील सुरक्षेबाबत पडताळणी करीत असल्याचे त्यांनी सांगितले. पटोले यांनी १२ एप्रिल २०१७ रोजी लोकसभेत तारांकीत प्रश्नाद्वारे मुद्दा उपस्थित करून भारतातील अणू उर्जा संस्थावर आतंकवादी किंवा सायबर हल्ला झाल्यास याचा सामना करण्यासाठी काय उपाययोजना, असा प्रश्न विचारला होता. अणू उर्जा संस्थांमध्ये उत्तम दर्जाची आंतरीक व बाह्य सुरक्षा स्थापित करण्यात आल्याचे तसेच, सायबर हल्ल्याला परतवून लावण्यासाठी उच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरण्यात येत असल्याचे उत्तर प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी दिले होते.

Web Title: Cyber ​​attack alerted about the attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.