मुद्रा लोन मार्च अखेरपर्यंत मिळणार

By Admin | Updated: February 27, 2016 00:56 IST2016-02-27T00:56:17+5:302016-02-27T00:56:17+5:30

'स्टेट बँकेची मुद्रा लोन देण्यास टाळाटाळ' या शिर्षकाखाली 'लोकमत'मध्ये वृत्त प्रकाशीत होताच जिल्हा प्रशासन व भाजपमध्ये एकच खळबळ उडाली.

Currency loan will be available till the end of March | मुद्रा लोन मार्च अखेरपर्यंत मिळणार

मुद्रा लोन मार्च अखेरपर्यंत मिळणार

कर्जाचे वाटप न झाल्यास आंदोलनाचा राजेश बांते यांचा इशारा
मोहाडी : 'स्टेट बँकेची मुद्रा लोन देण्यास टाळाटाळ' या शिर्षकाखाली 'लोकमत'मध्ये वृत्त प्रकाशीत होताच जिल्हा प्रशासन व भाजपमध्ये एकच खळबळ उडाली. भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे मुद्रा लोन प्रचार प्रमुख राजेश बांते यांनी मोहाडी येथे धाव घेवून समस्या जाणून घेतली. तसेच स्टेट बँकेचे एजीएम यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा केली. व्यवस्थापक श्वेता साळवे यांनी मुद्रा लोन देण्यास होत असलेल्या विलंबाबाबत समस्या सांगितल्या. मार्चअखेर पर्यंत गरजुंना चौकशीअंती कर्ज वाटप करण्याचे आश्वासन दिले. बँक आॅफ इंडिया शाखा मोहाडी येथे सुद्धा भेट दिली. व्यवस्थापक प्रेमकुमार यांनी आतापर्यंत जवळपास १०० लोकांना मुद्रा लोन दिल्याचे व कोणत्याही अर्जदाराची तक्रार नसल्याचे सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महत्वाकांक्षी मुद्रा लोन योजनेला येथील स्टेट बँकेद्वारे ठेंगा दाखविला जात असल्याने अनेक गरजुंची मोठी गैरसोय होत आहे. या बाबतचे वृत्त 'लोकमत'मध्ये प्रकाशित होताच लोकप्रतिनिधींनी याची गंभीर दखल घेत स्टेट बँकेच्या व्यवस्थापकाला याचा जाब विचारला. शासनाच्या लोककल्याणकारी योजना राबविण्यास शासकीय अधिकारी कर्मचारी कुचराई करतात. ज्यामुळे सामान्य जनतेपर्यंत शासकीय योजना पोहचतच नाही. जनतेमध्ये असंतोष निर्माण होतो. मात्र असे गैरवर्तन आता खपवून घेतले जाणार नाहीत, असा सज्जड दम भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेश बांते यांनी दिला आहे.
मार्च अखेर पर्यंत जर स्टेट बँकेतर्फे मुद्रालोन धारकांना कर्जाचे वाटप करण्यात आले नाही तर भाजपातर्फे बँकेसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राजेश बांते यांनी दिला आहे. यावेळी रविकांत देशमुख नगरसेवक, नरेंद्र निमकर उपस्थित होते. बँक आॅफ इंडिया शाखा मोहाडीतर्फे आजपर्यंत जवळपास १०० लोकांना मुद्राकर्ज वाटप करण्यात आले आहे. मात्र स्टेट बँकेतून फक्त चार ते पाच लोकांनाच मुद्रा कर्ज देण्यात आल्याचे व जवळपास १५० अर्ज धुळखात पडले असल्याचे समजते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Currency loan will be available till the end of March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.