विठ्ठलाच्या दिंडीत 'ईस्त्राईलभार्इं'चा गजर

By Admin | Updated: July 28, 2015 01:14 IST2015-07-28T01:14:30+5:302015-07-28T01:14:30+5:30

हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण होऊन दंगे करणारे बघायला मिळतात. अशा स्थितीत पवनी येथे सोमवारला आषाढी

The crystal of 'Estrology' in Vitthal's Dind | विठ्ठलाच्या दिंडीत 'ईस्त्राईलभार्इं'चा गजर

विठ्ठलाच्या दिंडीत 'ईस्त्राईलभार्इं'चा गजर

हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन : तेढ निर्माण करणाऱ्यांसाठी आदर्श
अशोक पारधी ल्ल पवनी
हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण होऊन दंगे करणारे बघायला मिळतात. अशा स्थितीत पवनी येथे सोमवारला आषाढी एकादशीनिमित्त निघालेल्या विठू माऊलीच्या दिंडीत ईस्त्राईलभाई यांनी सहभाग नोंदवून विठू माऊलीचा गजर केला. शहरातून निघालेल्या दिंडीत सहभाग घेऊन दोन्ही समाजासमोर आदर्श निर्माण केला.
या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे, असे राष्ट्रसंतांनी भजनातून सांगितले आहे. असे असताना एकमेकांना डिवचण्याचे कारस्थान रचून अपप्रवृत्तीचे लोक त्याचा धार्मिक भावनांचा खेळ मांडत आहेत.
यामुळे गुण्यागोविंदाने नांदणारे हिंदू-मुस्लीम बांधवांमध्ये सलोख्याच्या संबंधात नाहक तेढ निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठ्ठल रूक्माईच्या आज नामस्मरणाचा आजचा दिवस. आषाढी एकादशीला पंढरपूर येथे लाखो भाविक व वारकरी गोळा होतात. विठ्ठलाच्या नामस्मरणासाठी पवनी येथे ‘विठ्ठल नामाचा गजर’ करतात.
यात पवनी येथील ईस्त्राईलभाई या रिक्षाचालकाने मोठ्या श्रद्धेने व भक्तिभावाने माऊलीच्या दिंडीत सहभाग घेऊन बंधुभावाचा आदर्श समाजात घालून दिला.
साठी ओलांडलेले व मागील ३८ वर्षापासून रिक्षा चालविणारे ईस्त्राईल भाई यांनी हिंदू-मुस्लीम समाजात भाईचारा राहावा, या दृष्टीने या दिंडीत सहभाग घेतला. नुसता सहभागच नाही तर, त्यांनी विठ्ठलाचा गजर केला व शहरातून निघालेल्या दिंडीचा आनंद घेतला. त्यांच्या रिक्षात त्यांनी राम-सिताच्या वेशभूषा साकारलेल्या मुलांना बसवून मोठ्या भक्त्ीिभावाने त्यांना फिरविले.

उत्सवात धर्म आड येऊ नये
धर्म कोणताही असला तरी, देव एकच आहे. भावना पवित्र ठेवून केलेले काम मानवी मनाला आनंद देत राहतात. चंडिका देवी, श्रीदत्त भगवान, विठ्ठल-रुखमाई, गणपती उत्सवासह रमजान ईद या सणालाही महत्त्व आहे. त्यामुळे दोन्ही समाजबांधवांनी परस्परात हेवेदावे न ठेवता केवळ माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी एकमेकांना सहकार्य करावे. कोणत्याही समाजाचा उत्सव असो त्यात धर्म आड येता कामा नये.
- ईस्त्राईलभाई, पवनी.

Web Title: The crystal of 'Estrology' in Vitthal's Dind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.